कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम अखा बासमती राईस चांगला दुहून दहा मिनिटे बाजूला ठेवावा. तोपर्यंत बाकीची तयारी करावी. 1 कांदा पातळ काप चिरावा. दुसऱ्या कांदा बारीक चौकोनी तुकडे करावे. त्यानंतर टोमॅटो बारीक करून घ्यावा. आता मशरूम चांगले धुऊन घ्यावे आणि त्याचे छोटे चौकोनी तुकडे करावे.
- 2
त्यानंतर एका कढई मध्ये 1/4 वाटी तेल घालून पातळ चिरलेला कांदा परतून घ्यावा लाल होईपर्यंत. चांगला कुरकुरीत लाल झाल्यावर एका ताटली मध्ये बाजूला काढून ठेवावा.
- 3
आता दुसऱ्या कढई मध्ये 3 वाट्या गरम पाणी करायला ठेवावे. त्या पाण्यामध्ये थोडेसे चिमूटभर मीठ आणि 1 चमचा तेल घालावे. पाणी थोडे गरम झाल्यावर त्यामध्ये बाजूला ठेवलेला बासमती तांदूळ सगळा घालावा आणि शिजवून द्यावा. आता दुसऱ्या कढई मध्ये तिथे आपण कांदा परतला होत्या त्याच कडई मध्ये पुन्हा एकदा तेल घालून गरम करावे. त्यामध्ये जीरे, दालचिनी, तमालपत्र, वेलदोडे घालावे आणि थोडे परतून घ्यावे. त्यानंतर कांदा आणि आले लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे.
- 4
त्यानंतर टोमॅटो घालावा आणि चांगला परतून घ्यावा. त्यानंतर हळद आणि हिंग घालावे आणि परतून घ्यावे. आता मशरूम चे तुकडे घालावे. त्याचबरोबर हिरवी मिरचीचे, तुकडे गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालावे आणि चांगले परतून घ्यावे.
- 5
आता अर्धा वाटी पाणी घालून परत एकदा चांगले मिक्स करून साधारण 4-5 मिनिट शिजु द्यावे. आता एकीकडे आपला भात शिजला आहे.
- 6
आता हा शिजलेला भात एका चाळणी मध्ये काढून मोकळा करावा. त्यानंतर आपले शिजलेले मिश्रणामध्ये एक मोठा चमचा मिक्स झालेले मिश्रण एका ताटामध्ये काढावे. आता मिश्रणात राईस सर्व बाजूंनी घालावा. नंतर बाजूला ठेवलेल्या मशरूमचे मिश्रण ह्या राईस वर पसरावे आणि परत एक दुसरा लेयर राईस पसरून घालावा. त्यानंतर परतलेला लाल कांदा सर्व राईस वर पसरून घालावा.
- 7
आता त्यावर सर्व बाजूंनी तूप सोडावे. आणि अर्धा वाटी पाणी सर्व बाजूने घालावे. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. नंतर कढईवर झाकण ठेवून साधारण 4-5 मिनिटं मंद गॅसवर शिजू द्यावे. आता गॅस बंद करावा. आता आपला बिर्याणी राईस तयार झाला आहे.
- 8
आता आपला बिर्याणी राईस तयार झाला आहे आणि प्लेट मध्ये गरम गरम सर्व्ह करावा.
Similar Recipes
More Recipes




























टिप्पण्या (2)