भरले टोमॅटो करी (Stuffed Tomato Curry Recipe In Marathi)

#KJR
हिवाळ्यात बाजारात खुप ताज्या भाज्या मिळतात. तसेच टोमॅटो हे बाजारात बारावी महिने मिळतात पण हिवाळ्यात त्याची चव काही वेगळीच असते. ही खूप अशी मस्त हॉटेल स्टाईल टोमॅटो करी नक्की करून बघा.

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम टोमॅटो दोन-तीन पाण्यात धुऊन घ्यावे आणि त्याला अर्ध दोन भागात कापून घ्यावे.
- 2
ग्रेव्हीसाठी टोमॅटो उभे चिरून घ्यावे. आता हे कांदा टोमॅटो एका कढईत घालून त्यात काजू व पाणी घालून शिजवून घ्यावे. शिजवलेले टोमॅटो काजू एका मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात लसूण मीठ घालून बारीक पेस्ट करून घ्यावी.
- 3
टोमॅटोला भरण्याकरता पनीर किसून घ्यावे आणि बटाटा उकडलेला मॅश करून घ्यावा. या सारणात धने जिरं पूड मीठ थोडीशी हळद हे सर्व मिक्स करून घ्या. टोमॅटोच्या बिया काढून टोमॅटो गोल वाटी प्रमाणे स्कूप करून घ्यावे. तयार मसाला टोमॅटो मध्ये भरून घ्यावा.
- 4
कढईत तेल घालून त्यात वाटलेला ग्रेव्ही छान तेल सुटेस्तोवर परतून घ्यावे.त्यात गरम मसाला तिखट हळद घालून ग्रेव्ही तयार करून त्यात टोमॅटो अरेंज करावे.आणि वाफ येऊन शिजू द्यावे.तुम्ही टोमॅटो ग्रेव्हीत घालून मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये घालून शिजवून घेऊ शकता. फुलका रोटी कशाबरोबरही भाजी खूप मस्त लागते.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या