जळगावी वांग्याचे भरीत (Jalgavi Vangyache Bharit Recipe In Marathi)

#NVR जळगाव ला एक भरीत करण्याची खास पद्धत आहे. खानदेशी पद्धत आणि ते भरीत या स्टाईलने केलं तर जास्ती छान लागते. या भारतासाठी वांगी ही वेगळी असतात. हिरवी कमी बिया कमी आणि जास्त गर नक्की करून बघा.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम वांग्याला हलकं तेल लावून सुरीने छोटे छोटे होल करा. त्यात लसूण आणि हिरवी मिरची दाखवल्याप्रमाणे स्टफ करा. व वांग भाजून घ्या.
- 2
वांगी छान भाजून घेऊन थंड होऊ द्या.वांग मधुन कट करून घ्या.
- 3
वांग्याचा गर काढून घ्या. एका लाकडाच्या खल बत्यांत गर कुटुन घ्या.
- 4
खरबरीत कुटल्यावर त्या लाकडी पॉट मध्ये लसूण आलं मिरची चेचून घ्या.
- 5
कांद्याची पात बारीक चिरून घ्या.एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग हळद बारीक केलेली लसुण पेस्ट घालून घ्या.त्यात कुटलेला गर चवीनुसार मीठ परतुनी घ्या गरम गरम भाकरी बरोबर खायला द्या.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या