गावाकडचे हिरव्या वांग्याचे स्वादिष्ट भरीत (Hirvya Vangyache Bharit Recipe In Marathi)

#NVR... नागपूर साइडला भरिताचे हिरवे वांगे मिळतात. त्याच्या भरिताची चव वेगळीच असते. अशा या वांग्याचे भरीत केले आहे मी, आज.. आणि त्यात टाकले आहे, यावेळी मिळणारे तुरीचे दाणे आणि मेथी...
गावाकडचे हिरव्या वांग्याचे स्वादिष्ट भरीत (Hirvya Vangyache Bharit Recipe In Marathi)
#NVR... नागपूर साइडला भरिताचे हिरवे वांगे मिळतात. त्याच्या भरिताची चव वेगळीच असते. अशा या वांग्याचे भरीत केले आहे मी, आज.. आणि त्यात टाकले आहे, यावेळी मिळणारे तुरीचे दाणे आणि मेथी...
कुकिंग सूचना
- 1
- 2
आता गॅसवर एक जाळी ठेवून, त्यावर वांगी छान भाजून घ्यावीत. थोडे थंड झाल्यावर ते सोलून घ्यावीत.
- 3
सोललेल्या वांग्याना, सुरीच्या साहाय्याने, बघून, छान बारीक किंवा मॅश करून घ्यावे. कांदा, मिरची, टोमॅटो, मेथी धुवून बारीक चिरून घ्यावेत.
- 4
गॅसवर एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी जीरे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून किंचित परतून घ्यावे. त्यानंतर त्यात तुरीचे दाणे घालून मिनिटभर परतावे.
- 5
आता त्यात पातीचा कांदा टाकून मिक्स करावे. नंतर टोमॅटो टाकून, मिनिटभर शिजू द्यावे. नंतर त्यात हळद, तिखट आणि धणे पूड घालावी.
- 6
चांगले मिक्स केल्यानंतर, त्यात वांगे टाकावीत. किंचित परतून घ्यावे आणि आता त्यात चिरलेली मेथी टाकावी.
- 7
चवीनुसार मीठ आणि साखर घालून मिक्स करावे. गॅस बंद करावा. कोथिंबीर घालावी.
- 8
सर्व्हिंग बाउल मध्ये काढावे. स्वादिष्ट हिरव्या वांग्याचे भरीत, गरम पोळी, भाकरी सोबत, सलाद सह सर्व्ह करावे.
- 9
Similar Recipes
More Recipes
- मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi)
- झटपट सुरमई फ्राय कोकणी पदधतीने (Konkani Style Surmai Fry Recipe In Marathi)
- सुरमई फ्राय (Surmai Fry Recipe In Marathi)
- मालवणी पद्धतीने कवटाचा सामारा / अंड्याची करी(Malvani Style Andyachi Curry Recipe In Marathi)
- बटाट्याची रस्सा भाजी तांदळाची भाकरी(Batatyachi Rassa Bhaji Tandlachi Bhakri Recipe In Marathi)




























टिप्पण्या