पावट्याच्या शेंगांची मिक्स भाजी (Pavtachya Shenganganchi Recipe In Marathi)

पावट्याच्या शेंगांची मिक्स भाजी (Pavtachya Shenganganchi Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
पावटा, पापडी, वाटणा, तूरीच्या शेंगा मधले दाणे काढून ठेवावे, पापडी, पावटा शेंगा दाणे काढून तोडून ठेवाव्या. वांगी चिरुन फोडी पाण्यात घालून ठेवाव्या मग वांगी काळी पडत नाहीत.
- 2
शेवग्याच्या शेंगा आणि गाजर यांचे तुकडे करून घ्यावे. शेंगदाणे खरपूस भाजून त्याचे कुट करावे. नारळ खवणून ओलं खोबरं काढून ठेवावे.
- 3
कुकर मधे तेल घालून त्यात फोडणीसाठी मोहरी जीरे हिंग घालून तडतडल्यावर त्यात तिखट पूड हळद घालून लगेच जरासं पाणी घालावं त्यामुळे रस्सा छान रंगाचा दिसतो. मग त्यात पावटा आणि इतर भाज्या घालाव्या.
- 4
भाज्या परतून त्यात तिखट पूड हळद गरम मसाला पावडर धणे जीरे पावडर गोडा मसाला, आणि मीठ घालून मिक्स करावे मग त्यात ओलं खोबरं आणि शेंगदाणे कूट, मीठ, चिंचेचा कोळ आणि गुळ घालून मिक्स करून मग लागेल तसे पाणी घालून भाजी छान शिजवून घ्यावी.
- 5
शिजवलेल्या भाजीवर थोडेसे भाजलेले तीळ घालावे आणि पावट्याच्या शेंगांची मिक्स भाजी सर्व्ह करावी.
- 6
Similar Recipes
More Recipes
- बटर पनीर मसाला भाजी (Paneer Butter Masala Bhaji Recipe In Marathi)
- आलू लच्छा पराठा (Aloo Laccha Paratha Recipe In Marathi)
- हरयाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
- मांदेली बोंबील फ्राय (Mandeli Bombil Fry Recipe In Marathi)
- पावटा बटाटा रस्सा भाजी (Pavta Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)


















टिप्पण्या