पांढऱ्या कांदया चे लोणचे

उन्हाळ्याच्या दिवसात पांढरा कांदा खाणे अतिशय फायदेशिर असते.हा कांदा औषधी आहे हृदयाचे आरोग्य सुधारून कर्क रोगापासून बचाव होतो. हा कांदा कच्चा खाणे जास्त चांगले. वेगवेग्याळ्या कोशिंबिरी आणि सॅलड मध्ये वापरतात. लोणचेही खूप टेम्टिंग लागते माझी मैत्रण संध्या देशपांडे हिच्याकडून मी ही रेसिपी शिकले.

कुकिंग सूचना
- 1
कांदयाची साले काढून पातळ उभा चिरुन घेणे. कैरीचे साल काढून किसून घेणे
- 2
कांदा कैरी मिक्स करून त्यात रामबंधू आचार मसाला किंवा दुसरा कोणताही आचार मसाला, मीठ घालून मिक्स करून घ्यावे.
- 3
गॅसवर मध्यम आचेवर फोडणी पात्र ठेऊन त्यात तेल घालून तापल्यावर त्यात राई व हिंग घालून फोडणी तयार करून थोडी थंड झाल्यावर कांदा कैरीच्या मिश्रणात ओतावी.मिसळून घ्यावे.
- 4
पांढरा कांदा कैरीचे लोणचे तयार.
पानावर डावी कडील बाजूस वाढावे.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या