रवा व मक्याचे आप्पे

#ब्रेकफास्ट
आप्पे हा एक दाक्षिणात्य पदार्थ आहे जो मुळात तांदूळ व उडीद वापरून बनवला जातो. इथे मी पटकन होणारे असे रव्याचे आप्पे बनवले आहेत व पौष्टिकता वाढवायला त्यात ओट्स, गाजर व मका घातला आहे.
रवा व मक्याचे आप्पे
#ब्रेकफास्ट
आप्पे हा एक दाक्षिणात्य पदार्थ आहे जो मुळात तांदूळ व उडीद वापरून बनवला जातो. इथे मी पटकन होणारे असे रव्याचे आप्पे बनवले आहेत व पौष्टिकता वाढवायला त्यात ओट्स, गाजर व मका घातला आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रवा, ओट्स व नाचणी पीठ एका वाडग्यात जमा करा. त्यात फ्रूट सॉल्ट व तूप सोडले तर इतर सर्व जिन्नस एकत्र करा व लागेल तेवढे पाणी वापरून इडलीच्या पिठासारखे साधारण माध्यम घट्ट पीठ भिजवून घ्या. किमान १/२ - १ तास भिजत ठेवा.
- 2
आप्पे करायच्या वेळी, आप्पेपात्र तापवत ठेवा व प्रत्येक खोलात तूप घाला. पिठात त्याच वेळी फ्रूट सॉल्ट घालून छान ढवळून घ्या व जरुरी तेवढे पीठ प्रत्येक खोलात घाला.
- 3
झाकण ठेवून, आप्पे मध्यम आचेवर शिजू द्या. खालची बाजू भाजली गेली की आप्पेंवर थोडे तूप सोडा व उलटवा. उलटलेली बाजू देखील कुरकुरीत होईस्तोवर भाजून घ्या. वाटल्यास बाजूने अजून थोडे तूप सोडा.
- 4
गरमागरम रवा व मक्याचे आप्पे, कोथिंबीर व पुदिना चटणी किव्वा स्वीट चीली सॉस सोबत नाश्त्याला वाढा. शाळेत द्यायला डब्ब्यासाठी देखील हा एक उत्तम पदार्थ आहे!
Similar Recipes
More Recipes



टिप्पण्या (2)