सुरमई फ्राय | मालवणी सुरमई फ्राय

संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी swatis healthy kitchen youtube channel वर जा
http://www.youtube.com/channel/UCS0vJ_eBfmNVjrtshsQ6beg
#swatishealthykitchen #surmaifryrecipeinmarathi
#सुरमईफ्राय
रोज रोज व्हेज खाऊन कंटाळा आला म्हणुन म्हंटले आज काही नॉन व्हेज तयार करू.. मग परत विचार आला नॉन व्हेज मध्ये आता काय बनवायचे ... मग माझ्या नवऱ्याने आजच ताजी ताजी सुरमई आणली होती ...मग काय लागले लगेच तयारीला
तर मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण सुरमई फ्राय कसा तयार करायचा हे पाहणार आहोत... अगदी साधी व सोपी रेसिपी आहे...आणि आज मी सुरमई फ्राय मालवणी पद्धतीने करणार आहे ... चला तर वेळ न घालवता आपल्या आजच्या रेसिपीला सुरवात करूयात.

कुकिंग सूचना
- 1
या प्रमाणे साहित्य घेतलेले आहे
- 2
प्रथम घेतलेली सुरमई व्यवस्थित साफ करून स्वच्छ पाण्याखाली साफ करून घ्या त्यानंतर सुती कापडाने सुरमई पुसून घ्या त्यामुळे सुरमई मध्ये काही ओलेपणा असेल तर तो निघुन जाईल
- 3
सुरमईच्या सर्व तुकड्यामध्ये २ चमचे अदरक-लसुण-हिरवी मिरची पेस्ट, १/२ चमचा हळदी पावडर, २ चमचे लिंबाचा रस व थोडे मीठ घालुन घ्या. घातलेल्या सर्व जिन्नस सुरमईच्या तुकड्यांना छान लावुन घ्या...सर्व साहित्य व्यवस्थित लावुन झाल्यानतंर सुरमई चे तुकडे 20 ते 25 मिनिटे मेरिनेट करण्यासाठी ठेवुन द्या
- 4
सुरमईच्या तुकड्यांना वरून लावण्यासाठी मसाला तयार करून घ्या..१ का वाटीत 2 चमचे लाल तिखट, १ चमचा धनेपूड, १/२ चमचा गरम मसाला, १/२ चमचा हळदी पावडर, १ चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ घालुन घ्या त्यानंतर थोडे थोडे पाणी घालुन जास्त घट्ट देखील नाही व खूप जास्त पातळ देखील नाही मध्यम असेल असा मसाला तयार करून घ्या
- 5
सुरमईच्या तुकड्यांना कोट करण्यासाठी मिश्रण तयार करून घ्या... १ का डिश मध्ये १/२ वाटी तांदळाचे पीठ २ ते ३ चमचे रवा, १/४ चमचा लाल तिखट, थोडी हळद, थोडे मीठ घालून सर्व जिन्नस एकत्र करून घ्या.....तुम्ही तांदळाच्या पीठाचे व रव्याचे प्रमाण समान घेऊ शकता... रवा घातल्यामुळे सुरमई कुरकुरीत होते
- 6
तयार केलेला मसाला सुरमईच्या तुकड्यांना लावून घ्या
- 7
मसाला लावुन घेतलेल्या सर्व सुरमईच्या तुकड्यांना कोट करण्यासाठी तयार केलेले मिश्रण लावुन घ्या
- 8
एका पॅन मध्ये 3 ते ४ चमचे तेल घालावे व सुरमई चे तुकडे घालून घ्या व सुरमई चे तुकडे दोन्ही बाजुने प्रत्येकी 3 ते 4 मिनिटे फ्राय करुन घ्या
- 9
फोटो मध्ये जसा रंग आहे तसा रंग होईपर्यंत सुरमई फ्राय करून घ्या
- 10
येथे आपली सुरमई फ्राय तयार आहे कांदा व लिंबु ठेवुन आणि थोडी कोथिंबीर घालुन प्लॅट सर्व्ह करा
Made this recipe? Share a Cooksnap!
Let Swati's Healthy Kitchen know how it turned out.
Nothing says thank you like a photo!
Someone made your recipe and shared a Cooksnap!

Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)