चीज कॅरट राईस(चीज गाजर भात)

नविन काहीतरी करायचं असं करत, सुचलेली रेसिपी. मी चीज पावडर वापरलेय, पण त्याऐवजी चीज क्यूब वापरू शकता.
#lockdown,#workfromhome,
#let's cook, #stayathome
चीज कॅरट राईस(चीज गाजर भात)
नविन काहीतरी करायचं असं करत, सुचलेली रेसिपी. मी चीज पावडर वापरलेय, पण त्याऐवजी चीज क्यूब वापरू शकता.
#lockdown,#workfromhome,
#let's cook, #stayathome
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गाजर सोलून किसून घ्यावे. कांदा व लसूण बारीक चिरून घ्यावा. चीज क्यूब सुद्धा किसून घ्यावे. हिरव्या मिरच्या पण बारीक चिराव्यात.
- 2
तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या व लसूण घालून परतावे. त्यात कांदा घालून गुलाबीसर रंगावर परतावा. त्यात गाजर घालून परतून झाकण ठेवून शिजवावे. गाजर अर्धे कच्चे शिजल्यावर त्यात मिरीपूड, मीठ, साखर, चिलीफ्लेक्स घालून परतावे.
- 3
त्यात शिजलेला भात घालून एकत्र करावे. एक वाफ येऊ द्यावी. नंतर त्यात चीज पावडर किंवा किसलेले चीज घालून एकत्र करावे. झाकण ठेवून दोन मिनिटे वाफ येऊ द्यावी, आच मंद असावी. नाहीतर चीज तळाला लागून करपते.वरून चिरलेली कोथिंबीर घालून गरमच सर्व्ह करावा, चीज कॅरट राईस.
Keywords
Similar Recipes
More Recipes



टिप्पण्या