कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम दम आलू कुकरमध्ये 3 शिट्ट्या होईपर्यंत उकडून घ्यावेत.
- 2
दमा अल्लू ची साले काढू ओक सहाय्याने त्याला सर्व बाजूने छिद्रे पाडून घ्यावे.
- 3
कढईत तेल गरम करून तयार दम आलू तळून घ्यावेत.
- 4
कांद्याची साले काढून गॅसवर काळा होईपर्यंत भाजून घ्यावा.
- 5
तशाच प्रकारे खोबऱ्याचे वाटी सुद्धा काळी होईपर्यंत भाजून घ्यावी.
- 6
कढईत अर्धा चमचा तेल घालून शेंगदाणे तीळ विलायची दालचिनी मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यावे.
- 7
काळा केलेला कांदा काळा खोबरं व वरील सर्व मिश्रण थंड करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
- 8
कढईत तेल गरम करून जिरे मोहरी व हिंगाची फोडणी घालून घ्यावी.
- 9
त्यात वाटलेले मिश्रण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. त्यात लाल मिरची पावडर हळद मसाला घालावा.
आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण उकळून घ्यावे. - 10
मिश्रणाला उकळी आल्यानंतर छिद्रे पाडलेले दम आलू तयार मिश्रणात टाकून झाकण ठेवून दहा मिनिटे शिजवून घ्यावी.
- 11
चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून घ्यावे.
- 12
अशाप्रकारे मसालेदार दम आलू पोळी व भाताबरोबर सर करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes




टिप्पण्या