Potato Manchurian

Vrushali Patil Gawand
Vrushali Patil Gawand @cook_19754070

# बटाटा
सर्वांनाच आवडणारा आणि कशातही मिसळणारा असा हा बटाटा ..तर मग हयाची ' चायनीज डिश ' तो बनती ही हैं !

Potato Manchurian

# बटाटा
सर्वांनाच आवडणारा आणि कशातही मिसळणारा असा हा बटाटा ..तर मग हयाची ' चायनीज डिश ' तो बनती ही हैं !

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. बटाटे मध्यम आकाराचे
  2. मीठ चवीनुसार आणि तेल
  3. आलं लसूण पेस्ट
  4. २ टे.स्पुनतांदूळ पीठ ,
  5. २ टे. स्पुनमैदा
  6. हिरवी मिरची उभी चिरलेली
  7. लसूण बारीक कापून
  8. कांदा पात आणि हिरवी, लाल, पिवळी शिमला मिरची उभी चिरलेली
  9. १ चमचाकाश्मिरी मिरची पावडर
  10. सोया, चिली आणि टोमॅटो साॅस

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम सर्व भाज्या साफ करून कापून घेणे, लसूण बारीक चिरून घेणे, बटाटे सालं काढून तुकडे करून धुवून घेणे.

  2. 2

    आता पाण्यात थोडे मीठ घालून बटाटे साधारण ५ ते ६ मिनिटे मध्यम आचेवर अर्धेच शिजवून घ्या व नंतर गॅस बंद करून बटाटे चाळणीत पाणी गाळून थंड करत ठेवा. आता मॅरीनेट करण्यासाठी एका बाऊल मध्ये मैदा, तांदूळ पीठ, आलं लसूण पेस्ट, काश्मिरी मिरची पावडर थोडे थोडे पाणी घालून जरा जाडसर मिश्रण बनवावे. व त्यात बटाटे मिक्स करून घ्या.

  3. 3

    आता गॅसवर कढईत तेल तापवून त्यात मिक्स केलेले बटाटे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या.

  4. 4

    आता दुसऱ्या पॅनमध्ये तेल तापवून त्यात चिरलेला लसूण, पातीचा कांदा आणि तिन्ही शिमला मिरची (लाल पिवळी हिरवी) घालून मोठ्या आचेवर परतावे. चायनीज पदार्थ हे मोठ्या आचेवर बनवतात. नंतर त्यात सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि चिली सॉस घालावा. आणि व्यवस्थित क्रिस्पी परतल्यावर त्यात थोडे मीठ घालून (आधी बटाट्यात मीठ घातलेले होते) तळलेले बटाटे घालून २ मिनिटे परतून वरून कांद्याची पात घालून गॅस बंद करा.

  5. 5

    गरमागरम ड्राय पोटॅटो मंचुरीयन खाण्यासाठी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vrushali Patil Gawand
Vrushali Patil Gawand @cook_19754070
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes