रस्सा बीट रूट पातोडी
#व्हॅलेंटाईन
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बेसन पीठ व पाणी यांचे मिश्रण बनवून घ्यावे.
- 2
हिरवी मिरची लसूण व आद्रक मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
- 3
कढईमध्ये तेल गरम करून जिरे मोहरीची फोडणी घालून मिरची लसूण अद्रक ची पेस्ट नंतरुन तयार बेसन व पाण्याचे मिश्रण घालून हळद परतून घ्यावे.
- 4
नंतरुन तयार बेसन व पाण्याचे मिश्रण घालून. बेसन शिजेपर्यंत परतावे.
- 5
नंतर त्यात किसलेले बीट घालून मिश्रण झाकण ठेवून शिजवून घ्यावे
- 6
नंतर एका ताटलीमध्ये काढून पसरवून घ्यावे व त्यावर ती किसलेले खोबरे व कोथिंबीर घालावी
- 7
थंड झाल्यानंतर हव्या त्या आकारांमध्ये कापून घ्यावेत
- 8
रस्सा बनवण्यासाठी थोडे तेल गरम करून कांदा टोमॅटो कोबरे लसणीच्या पाकळ्या मंद आचेवर परतून घ्याव्यात.
- 9
वरील सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची प्युरी बनवून घ्यावी.
- 10
कढईत तेल गरम करून जिरे मोहरी ची फोडणी घालून प्युरी तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे
- 11
नंतर त्यात लाल मिरची पावडर गरम मसाला हळदी पावडर घालून परतून घ्यावे.
- 12
पाणी व मीठ घालून मिश्रणाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा
- 13
अशाप्रकारे तयार रस्सा बिट पाटोडी पोळी भाताबरोबर सर करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes













टिप्पण्या