झणझणीत मिसळ

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3 sprouts हा की वर्ड वापरून मोड आलेले मिक्स कडधान्य वापरून झणझणीत मिसळ तयार केली.

झणझणीत मिसळ

#goldenapron3 sprouts हा की वर्ड वापरून मोड आलेले मिक्स कडधान्य वापरून झणझणीत मिसळ तयार केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपमोड आलेली मिक्स कडधान्य (मूग, मटकी, काळा वाटाणा, मसुर)
  2. कांदे
  3. टोमॅटो
  4. 2 टेबलस्पूनसुक खोबर,लसूण,वाटून
  5. 1/4 कपकोथिंबीर
  6. हिरवी मिरची
  7. 1/4 टीस्पूनहळद
  8. 1/4टिस्पून लाल तिखट
  9. चिमूटभरहिंग
  10. 1 टीस्पूनमीठ
  11. 1/4 टीस्पूनधणे
  12. 1/4 टीस्पूनजिरे
  13. १ टेबलस्पून तेल
  14. 1/4 कपकोथिंबीर
  15. 2 कपपाणी
  16. 1/2 कपफरसाण
  17. लिंबाची फोड
  18. दही व पाव मिसळी सोबत खायला

कुकिंग सूचना

  1. 1

    मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य एका ताटलीत घेतले.

  2. 2

    चिरलेला कांदा,लसूण, खोबर, धणे, जिरे लालसर होईपर्यंत परतले.

  3. 3

    परतलेले साहित्य,टोमॅटो,कोथिंबीर, मिरची मिक्सरमधून बारीक केले व कडधान्य शिजवून घेतली.

  4. 4

    कढईत तेल घालून त्यात वाटण तेल सुटेपर्यंत परतले

  5. 5

    मिश्रण छान परतल्यावर शिजवलेली कडधान्य त्यात घातली.

  6. 6

    पाणी घालून छान उकळी काढली.त्यात मीठ घातले.

  7. 7

    बाउलमध्ये फरसाण घेऊन त्यात तयार उसळ घातली,त्यावर कांदा कोथिंबीर घातली.

  8. 8

    झणझणीत मिसळ खाताना त्यासोबत बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबाची फोड, थोडे
    फरसाण, वाटीत दही घेतले आणि पावांसोबत सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes