कोबी पराठा
कुकिंग सूचना
- 1
कोबी किसून घ्या. मिरची कोथिंबीर पुदिना आणि लसूण यांची भरड वाटून घ्या. आणि कोबीचा किस आणि वाटलेली भरड ह्यामध्ये धणे जिरे पूड मीठ घालून एकत्र करून घ्या. नंतर त्यात गव्हाचे पीठ घालून मिश्रण व्यवस्थित मळून घ्यावे. पाण्याची अजिबात आवश्यकता नाही.
- 2
मग पोळ पाटावर कोबीचे पराठे लाटून घ्यावे. तवा गरम करावा आणि मगच त्यावर पराठा टाकावा. तेल किंवा तूपावर हा पराठा दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजावा. मी सोबत टोमॅटो सूप आणि बीटाचा रायते बनवलेले होते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11956648










टिप्पण्या