एग् फ्राईड राईस

TejashreeGanesh
TejashreeGanesh @cook_17064963
Muscat
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मि.
  1. ३०० ग्रॅम शिजलेला पाांढरा भात
  2. अंडी
  3. ३ टेस्पून तेल
  4. १ छोटा कांदा
  5. ४-५ लसून पाकळ्या
  6. १/२ ईंच आलं
  7. १-१/२ टिस्पून मिरपुड
  8. १०० ग्रॅम मिक्स भाज्या (वाटाणे, गाजर, ढोबळी मिरची वगैरे)
  9. चविनुसार मिठ
  10. कांद्याची पात चिरून (ऐच्छिक)

कुकिंग सूचना

१५ मि.
  1. 1

    प्रथम एका पॅनमधे १ टेस्पून तेल टाकावे व त्यात अंडी फोडून टाकावीत.

  2. 2

    अंड्यांच्या वरून १/२ टिस्पून मिरपुड व मिठ टाकावे आणि हलक्या हाताने ते एकत्र करून घ्यावे व त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत.

  3. 3

    हे तुकडे बाजूला काढून घ्यावेत. सर्व भाज्या चिरून घ्याव्यात, कांदा, लसून व आलं बारिक चिरून घ्यावं.

  4. 4

    एका कढईमधे उरलेले तेल टाकून त्यात कांदा परतावा, आलं, लसून टाकावं. हलकसं परतून घ्यावं.

  5. 5

    तसेच चिरलेली ढोबळी मिरची, गाजर, वटाणे टाकून परतून घ्यावेत. (ह्या भाज्या टाकणे ऐच्छिक आहे)

  6. 6

    त्यामधे उरलेली मिरपुड व मिठ टाकावे.

  7. 7

    थोडे परतून घेऊन त्यात पांढरा भात टाकावा. व मंद आचेवर परतून घेऊन अंडी मिक्स करावीत.

  8. 8

    झाकण ठेवून १ -२ मि वाफ येऊ द्यावी.

  9. 9

    कांद्याची पात टाकून व्यवस्थित एकत्र करून गरम गरम सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
TejashreeGanesh
TejashreeGanesh @cook_17064963
रोजी
Muscat
Cooking and Baking are my one of the favorite hobbies.. I really love to spend time along with my oven.. 😊😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes