खमण ढोकळा (गुजराथ स्पेशल डिश)
#Lockdown recipe
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहीत्य
- 2
सर्व प्रथम बेसनपिठ एका गाळणीच्या साहाय्याने व पिठ चाळतात त्या चाळणीने पिठ चाळुण घ्यावे असे केले की त्यात हवा भरते आता पिठ छान व्हिक्सल ने मिक्स करून घेतले व त्यात साखर व रवा घालावे व छान मिक्स केले चविप्रमाणे मिठ घालून त्यात पाणी घातले व छान फेटुण घेतले आता ह्यात हळद घालून मिक्स केले व तेल ही घातले व छान बॕटर तयार केले बॕटरमध्ये ईनो घालून छान फेटुण घेतले बॕटरची कन्टटेनसी अशी पाहिजे चमच्याने बॕटर पटकन पडले पाहिजे.
- 3
आता कुकरमध्ये पाणी घाला 1 ते 1/2 ग्लास व गॕसवर कुकर ठेवा व कूकरमध्ये एक रिंग ठेवा व पाणी गरम होवुद्या आता एका डब्याला तेलाने ग्रिस करून त्यात ढोकळ्याचे बॕटर ओता लक्षात ठेवा मि ह्यला टॕप केले नाही तुम्ही ही करू नका नाहीतर त्यात जी हवा आहे ती निघुन जाईल ढोकळा फुगणार नाही कुकरची रिंग तशीच ठेवा शिट्टी काढुण टाका कुकरमध्ये डबा ठेवून 15 मिनांट ढोकळा शिजु द्यावा आता कुकरचे झाकण उघडून एका सुरीने चेक करा ढोकळा शिजलाकी नाही सुरी साफ असावी ती त्यात टाका जर ति साफ निघाली तर ढोकळा तयार आहे.
- 4
जर ढोकळा कच्चा असेलतर सुरीला चिकटून निघेल मि जेव्हा सुरीने चेक केले तेव्हा सुरी चिकट होती मग मि 5 मिनिट अजुन ठेवले आता सुरी एकदम साफ निघाली म्हणजेच आता ढोकळा तयार आहे आता ढोकळा कुकरमधुन काढून थंड होण्यासाठी ठेवा नंतर एक प्लेट वर ठेवून ती प्लेट ऊपडी करून त्याच्यावर हाताने ठोकून ढोकळा काढून घ्यावा आता ढोकळा कट करून घ्या ढोकळा जर कटकरताना तुटला नाही तर आपला ढोकळा परफेक्ट झाला.
- 5
आता एका पॕनमध्ये तेल टाका व तेल गरम झाले की त्यात राई टाका ती तडतडलीकी कढीपता टाका व हीरवी मिरची मधुन चिरुन त्यात टाका व साखर आणि पाणी घालून गॕस बंद करा व ढोकळ्यावर तडका व पाणी घाला आता एका सव्हिंगप्लेटमध्ये काढून ढोकळ्यावर कोथिंबीरने गारनिश करून ढोकळा सव्हॕ करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes














टिप्पण्या (2)