कुकिंग सूचना
- 1
एका बाऊल मध्ये ताक घेवून त्यात बेसन घालून चांगले मीक्स करून घेतले. गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत.आल, व हिरवी मीरची मीक्सरवरपेस्ट करून घेतली.
- 2
गॅस वर पॅनमध्ये तूप गरम करून त्यात मेथ्या जीरे आलं हिरवी मीरची पेस्ट लवंग काळी मिरी दालचिनी लाल मिरची सर्व साहित्य घालून परतून मग त्यावर ताकाचे मीश्रण ओतले.
- 3
ताक घातल्यावर कढीला चांगली उकळी येऊ दीली. 2-3 उकळ्या आल्यावर दिला दाटपणा चांगला येतो. मग त्यात मीठ व साखरआणि थोडी कोथिंबीर घालून एक उकळी आल्यावर गॅस बंद केला.व कढी बाऊल मध्ये काढून वरून कोथिंबीर घालून सर्व्ह केले.
- 4
ह्या कढीला आंबट गोड खडा मसाला व आलं मीरचीच्या वाटणाचा तिखटपणा आशा तीन ही छान चवी येतात. कढीत मीठ व साखर कढी उकळल्यावर अगदी शेवटी घालावे म्हणजे कढी चोथापाणी होत नाही.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
ताकाची कढी (takachi kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी 6कधी बऱ्याच प्रकारे करता येते..मला गुजराती पद्धतीने केलेली कढी खूप आवडते...म्हणून मी आज गुजराती पद्धतीने कढी केली... चला तर पाहू मग कशी करायची कढी... Mansi Patwari -
-
रुचकर कढी (kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी ...#रोज रोज आमटी वरण खाऊन कंटाळा आला की हमखास कढीचे वेध लागतात आम्हांला....कढी म्हणजे पंचपक्वानच जणू..कढी इतका मधुर,रुचकर पर्याय इतर कशाला असूच शकत नाही...एवढं आमचं कढी प्रेम...मग कधी कढी भात,कधी कढी खिचडी,तर काही वेळेस चक्क कढी पोळी हा बेत असतो..तसं पहायला गेलं तर कढी ही खाण्यापेक्षा पिण्यात जी मजा असते ती औरच असते..वाट्याच्या वाट्या कढी स्वाहा केली जाते.. कढी हा खाद्य प्रकार अखिल भारत वर्षात फारच लोकप्रिय..म्हणूनच वेगवेगळ्या प्रांतात कढीचे वेगवेगळे प्रकार केले जातात.. महाराष्ट्रातील कढी,कोकणीकढी,सोलकढी,गुजराती कढी,राजस्थानी कढी,पंजाबी कढी...अनेक प्रकार .. एवढे चवदार ताक,ताकाची कढी ..त्यावरुन आपल्या मराठीत तेवढ्याच interesting म्हणी आहेत ..म्हणजे बघा हं..बोलाचीच कढी बोलाचाच भात..शिळ्या कढीला ऊत आणणे..शेजीबाईची कढी न् धावू धावू वाढी..जिचे घरी ताक तिचे वरती नाक..ताक नाशी भाजी घर नाशी शेजारी..गाडगे धुवून कढी करी..ताक ते ताक दूध ते दूध..प्रीतीचो मोगो कढीयेच्या निमतान माज्याकडे ये गो.. तसचं तान्हा मुलांशी खेळताना त्यांच्या हाताची इवली इवली बोटे दूमडून आपण वरण,भात,भाजी,पोळी,कढी ...कढीची पाळ फुटली ती कोपर गावाहून बगल गावाला गेली गेली ..असं म्हणून गुदगुल्या करतो...मग तान्हुल्यांच निरागस खिदळणं ऐकण्यासारखं स्वर्गसुख नाही..बरोबर ना.. आहे की नाही गंमत.. खाद्यसंस्कृती ही लोक संस्कृतीत,लोक साहित्यात कशी बेमालूमपणे मिसळून गेलीये..आता शिळ्या कढीला जास्त ऊत न आणता आपण करुया रुचकर कढी...😀 Bhagyashree Lele -
-
-
-
ताज्या ताकाची कढी (takachi kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफीरोज रोज वरण भात व आमटी भात खाऊन कंटाळा येतो जेवणात गरम भाताबरोबर कढी ची वारायटी भूर्कायला मस्त मजा येते. Shubhangi Ghalsasi -
-
गुजराती कढी
#फोटोग्राफीगुजराती कढी ही पारंपरिक रेसिपि आहे.जी लग्न कार्यात ही बनवली जाते, ह्या कढी मध्ये आख्खे खडे मसाले वापरून बनवलेली चवीला अतिशय रुचकर अशी ही कढी आहे, तर पाहुयात गुजराती कढी ची पाककृती. Shilpa Wani -
-
-
शेवग्याच्या शेंगांची कढी
#फोटोग्राफी#कढीताकाची कढी महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. कढी भात, कढी खिचडी हे प्रकार सगळीकडे आवडीने खाल्ले जातात. मी शेवग्याच्या शेंगा घालून कढी करते. फक्त शिजवलेल्या शेंगा नाही तर थोड्या शेंगांचा गर काढून कढीत घालते. त्यामुळे कढीला शेंगांचा छान स्वाद येतो. हे माझं स्वतःचं इनोव्हेशन आहे. Sudha Kunkalienkar -
-
-
-
-
-
दह्याची झटपट कढी
#फोटोग्राफी कढी हा तसा भारतातील अनेक प्रांतामध्ये बनवला जाणार पदार्थ.विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या प्रांतामध्ये कढीची लोकप्रियता जास्त. मी बेसिक महाराष्ट्रीयन कढीची रेसिपी सांगते. Prajakta Patil -
-
सहगारी राब अर्थात राजगिरा कढी (rajgira kadhi recipe in marathi)
#9_रात्रींचा_जल्लोष #nrr #राजगिरा#राजगिरा_कढी #दिवस_सहावा#नवरात्रौत्सवातील_नवदुर्गा🙏🌹🙏 शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हां सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा💐🌹🙏 आई जगदंबेचे दैवीकृपाआशिर्वाद आपल्या सर्वांवर नित्य असोत ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना🙏🌹🙏 शारदीय नवरात्र..आजचा सहावा दिवस..आज घरोघरी जाऊन जोगवा मागितला जातो..मी लहान असताना माझी मावशी षष्ठीच्या दिवशी तिच्या बिल्डिंग मधल्या पाच घरी मला जोगवा मागायला पाठवायची..जोगवा ही देवीच्या उपासनेतील एक संकल्पना आहे.जोगवा मागणे म्हणजे भिक्षा मागणे ,कोरडा शिधा मागणे अथवा कृपाप्रसाद मागणे. देवीचा म्हणजे अंबा, भवानी, रेणुका आदिशक्तिदेवतांपुढे पदर पसरून कृपाप्रसाद मागितला जातो.संत एकनाथांचा जोगवा--अनादि निर्गुण प्रगटली भवानी। अहंमहिषासुर मर्दनालागुनी।। त्रिविध तापांची कराया झाडणी। भक्तांलागुनी पावसी निर्वाणीं।। आईचा जोगवा जोगवा मागेन। व्दैत सारूनि माळ मी घालीन।। हातीं बोधाचा झेंडा घेईन। भेदरहित वारीसी जाईन।। नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा। करूनी पिटीं मागेन ज्ञान रुपीपुत्रा।।6.....कात्यायनी- कात्यायन ऋषींची कन्या म्हणून ही कात्यायनी. कात्यायन ऋषींनी त्यांच्या पोटी देवीने मुलीच्या रूपात जन्म घ्यावा म्हणून देवी भगवतीची कठोर तपस्या केली होती व म्हणून देवीने कात्यायनीच्या रूपाने जन्म घेतला होता.कात्यायनी देवीला तीन नेत्र आहेत. ही सिंहावर आरूढ झालेली आहे. मत्स्यपुराणात हिला दहा भुजा असल्याचे म्हटले आहे.पहिल्या चार शक्तिपीठात हिचे नाव समाविष्ट आहे. हिच्या उपासनेने चतुर्विध पुरुषार्धाची प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे.🙏🌹🙏 Bhagyashree Lele -
कढी ढोकळा (kadhi dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 9 #post 1#फ्युजन म्हणजे दोन खाद्यसंस्कृती चा मिलाफ त्यामुळे मी राजस्थान आणि गुजरातचा दोन वेगवेगळ्या पदार्थांचा एकाच पदार्थांमध्ये समावेश केला असून त्यामुळे खूप छान चव आली व नवीन प्रकार समोर आला आहे अप्रतिम चवीचा हा ढोकळा आहे Nisha Pawar -
-
गुजराथी कढी
वेगवेगळ्या प्रकारच्या कढी आपण बनवतो.वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतींनी कढी बनते.गुजराथी कढी आंबट,गोड ,थोडी तिखट अशा चवीची असून मस्त लागते.खिचडी,मसालेभात सोबत खूपच छान.... Preeti V. Salvi -
ताकाची कढी (Takachi curry recipe in marathi)
#फोटोग्राफी ताकाची काढी सारासार खूप जन करतात वेगवेगळ्या पद्धतीने अशीच एक पद्धत आपण पाहू. Veena Suki Bobhate -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12318121
टिप्पण्या