पंजाबी सामोसा (punjabi samosa recipe in marathi)

#आई काय सांगू आई बद्दल सगळे शब्द, विचार कमीच तिच्या पुढे, तिने बनवल, तिने घडवलं, ह्या जगात सन्मानाने जगण शिकवलं, अशा माज्या आईसाठी ही माज्याकडून मदर्स डे निमित्ताने भेट
खरं सांगू तर आपण कधीच आईला नाही विचारत कि आई तुला काय आवडते आणि तिला हे सांगायला वेळ ही नसतो ती फक्त आपल्याला काय आवडते ह्यातच जगात असतें
असा माज्या आईसाठी माज्याकडून ही रेसिपि

कुकिंग सूचना
- 1
मिरची आणि कोथींबीर ची बारीक पेस्ट करून घ्या.बटाटे उकडून साले काढून घ्या व त्याचे हातानी तुकडे करा
- 2
एका भाड्यात तीन टेबलस्पून तेल घाला, ते गरम झाले कि त्यात मिरची कोथिंबीर पेस्ट घालून ती चांगली भाजून घ्या, मग त्यात मटार घाला ते शिजले कि बटाटे घालून मिक्स करा आणि त्यात वरील सर्व मसाले आणि आमचूर पावडर, मीठ घालून हलवून घ्या. झाली सामोसा भाजी तयार
- 3
फोडणी पात्रात तूप गरम करा, मैदा चाळून घ्या. त्यात मीठ घाला, आता गरम केलेलं तूप घालून ते चमच्याने हलवून घ्या व पिठाची मूठ बांधली जाते आहे कि नाही ते बघा
- 4
थंड पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या.आणि 20 मिनिट ओल्या कपडा घालून पीठ झाकून ठेवा. 20 मिनीटांनी ते पीठ चांगले मळून घ्या व त्याचे गोळे तयार करा. सामोसा सील करण्यासाठी मैदा पेस्ट बनवून घ्या
- 5
एक गोळा लाटून त्याचे खाली दाखवल्या प्रमाणे 2 भाग करा व पारी चिकटवून कोन तयार करा
- 6
आता तो कोण हातावर घेऊन त्यात भाजी भरा व सामोसा बंद करा
- 7
कढई मध्ये तेल गरम करा व सामोसे तळून घ्या.सामोसे तळताना गॅस मेडीयम ठेवा आणि गरम गरम सर्व्ह जरा
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (10)