अंडा मसाला बिर्यानी (anda masala biryani recipe in marathi)

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

#myfirstrecipe घरी जेव्हा मांंसाहारी चा बेत करायचा मनात आले पण काही साहित्य उपलब्ध नसेल तर अंडा बिर्यानी चा बेत करते. मुल एकदम खुश होउन जेवण फत्ते करतात. घरात प्रत्येक व्यक्ती आवडीने मी बनवलेली हि बिर्यानी खातात .म्हणुन पहिली हिच पोस्ट करतेय

अंडा मसाला बिर्यानी (anda masala biryani recipe in marathi)

#myfirstrecipe घरी जेव्हा मांंसाहारी चा बेत करायचा मनात आले पण काही साहित्य उपलब्ध नसेल तर अंडा बिर्यानी चा बेत करते. मुल एकदम खुश होउन जेवण फत्ते करतात. घरात प्रत्येक व्यक्ती आवडीने मी बनवलेली हि बिर्यानी खातात .म्हणुन पहिली हिच पोस्ट करतेय

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 100 ग्रॅमबासमती तांदूळ
  2. 5अंडी उकडलेली
  3. 5लवंग
  4. 5वेलची
  5. 2तेजपत्ता
  6. 1 तुकडादालचिनी
  7. 50 ग्रॅमखोबरे
  8. 1कांंदा उभा पातळ कापलेला
  9. 2टोमॅटो बारीक कापलेला
  10. 1कांंदा बारीक कापलेला
  11. 2 टेबलस्पुनदही
  12. 2 टेबलस्पुन आले लसुण पेस्ट
  13. 1 वाटीकोथिंंबीर
  14. अर्धी वाटी तळलेला कांंदा
  15. 1 टेबलस्पुनगरम मसाला
  16. 1 टेबलस्पुनलाल तिखट
  17. 1 टेबलस्पुनहळद
  18. 2 टेबलस्पुनतुप
  19. 4 टेबलस्पुनतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    एका कढईमध्ये 1 टेबलस्पुन तेल गरम करुन त्यात उभा कापलेला कांंदा व खोबरे भाजून घ्यावे. थंंड करुन मिक्सर मध्ये वाटावे. अंडी उकडुन व सोलुन ठेवावी

  2. 2

    तांंदुळ धुवुन घ्यावा. एका पातेल्यात तेल गरम करावे. त्यात वेलची,लवंग,दालचिनी,तेजपत्ता व तांंदुळ भाजून घ्यावा. दुप्पट गरम पाणी व मीठ घालुन भात शिजवावा. शिजवलेला भात ताटात पसरुन थंड करा

  3. 3

    दुसर्या कढई मध्ये तेल गरम करावे. बारीक कापलेला कांंदा परतुन घ्या. टोमॅटो घालुन परतवा. आलेलसुण पेस्ट,लाल तिख़ट,हळद,गरम मसाला, मीठ घालुन परतुन घ्या. वाटलेल वाटण घालून शिजवा. मसाला चांंगला शिजत आला की त्यामध्ये उकडलेलि अंंडी घाला. 1मिनीटा साठी शिजवा

  4. 4

    एका पातेल्यात तुप पसरवा. त्यावर भाताचा थर द्या. अंड्याचा मसाला पसरवा. पुन्हाभाताचा थर द्या. दही थोडे टाका, कोथिबीर पसरवा. तळलेला कांंदा पसरवा. वरुन झाकण देवुन तव्यावर मंंद आचेवर पातेल 5मिनीटासाठि ठेवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
रोजी
गोवा

टिप्पण्या

Similar Recipes