रेस्टॉरंट स्टाइल दाल तडका (DAL TADAKA RECIPE IN MARATHI)

दाल तडका
आता काय सांगायचे आमच्या अहो ना दाल तडका खूपच प्यारा, त्यांना साधे जेवणच पाहिजे पण त्यात वेरिएशन जरुरी आहे , वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी त्यांच्या आवडीचे , आमच्या घरी जेवण त्यांच्या सांगण्या नुसारच बनत असते म्हणून मला काही टेन्शन नाही , सकाळ संध्याकाळ चा मेनू तेच ठरवतील फक्त आपल्याला बनवायचे असते

कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम डाळ धुवून कुकर मध्ये शिजवून घ्यावी. कांदा टोमॅटो लसूण मिर्ची बारीक कापून घ्यावी
- 2
एका लोखंडी कढईत तेल व तूप गरम करून सर्वप्रथम जिर टाका, जिर तडतडले की लाल सुकी मिरची कडीपत्ता व हिंग टाका व लसूण, हिरवी मिरची टाका थोडे झाले की कांदा थोडा झाला की धने पावडर,तिखट,हळद टाका व लगेच टोमॅटो टाका व कसुरी मेथी टाका होवू द्या व घोटत रहा, थोडा मसाला साईड ल वाटीत काढून ठेवा
- 3
आता वरण तडका द्या, कढईत टाका व थोड्या वेळ उकळू द्या व वरून कोथिंबीर टाका
- 4
आता एका भांड्यात वरण टाकून, त्यावर आपण वेगळा ठेवलेला मसाला तडका पॅन मध्ये गरम करून वरण वर टाका व कोथिंबीर टाका, आपला तडका डाळ तयार आहे
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या