आंब्याची बाठवणी (aambyachi balvani recipe in marathi)

हा प्रकार तसा पूर्ण कोकण पट्ट्यात प्रसिद्ध, अगदी ठाणे जिल्ह्यातही... बनवायची पद्धत थोडीफार वेगवेगळी. कोकणात गुळ, नारळाचं दूध घालून केली जाते आणि पालघर तालुक्यात काहीजण चिंच घालतात. पण मी जी रेसिपी देतेय ती माझ्या आईची. यासाठी खास रायवळ आंबे घेतले म्हणजे मस्त आंबट गोड बठवणी होते आणि मग ती खाताना जी चव येते ना .... आहाहा....

कुकिंग सूचना
- 1
आंबे सोलून घ्या आणि त्याचे सालीला असलेला गर थोड्या पाण्यात कालवून घ्या.
- 2
कढईमध्ये तेल घालून जिरे हिंग मोहरी कढीपत्ता आणि आले लसूण जिरे काळीमिरी पेस्ट याची फोडणी द्या.
- 3
त्यात आंबे घालून परतून घ्या, वरून मीठ, हळद, लाल तिखट घालून परतून घ्या आणि मग सालीचे पाणी घाला.
- 4
नीट परतून ५ मिनिटे झाकून शिजवा, वरून गरम मसाला आणि खोबरे घालून ढवळा. एक वाफ येऊ द्या आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)