प्रॉनस् राईस (prawns rice recipe in marathi)

#रेसिपीबुक
रेसिपी बुक ची गोड रेसिपी झाली आता ही तिखट आणि मी मासेखाऊं म्हणून नॉन वेज😜🍤🍤... हि रेसिपी तशी थोडी वेळ खाऊ पण तेवढी बनवली की बाकी काही नको. कारण घरात सगळे prawns lover ना. त्याचं काय आहे कोळंबीला नाही काटा, नाही ताठा... फिर भी मार्केट वॅल्यू ज्यादा...😄😄 असते एकेकाच नशीब.😜😜 असो. तर lockdown मध्ये घेतलेल्या भाज्या थोड्या थोड्या उरल्या आणि मग त्या प्रॉनस बरोबर एकत्र संपवायचा घाट घातला आणि बनवला प्रॉनस् राइस...😋😋 यम्मी आणि टेस्टी...

कुकिंग सूचना
- 1
सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्या आणि उभ्या मध्यम आकारात चिरून घ्या.
- 2
कोळंबी साफ करून धुवून घ्या, त्याला लिंबू व चिमूटभर हळद लावून ठेवा.
- 3
तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घालून नंतर अर्ध कच्चा (७०%) शिजवून घ्या. शिजताना पाण्यात 1 टीस्पून तेल आणि 1 टेबलस्पून मीठ घाला. हा अर्धा शिजलेला भात एका चाळणीत उपसून गार करत ठेवा.
- 4
एका मोठ्या पातेल्यात तेल घालून त्यात अनुक्रमे चिरलेला लसूण,आले, कांदा, टोमॅटो,शिमला मिरची, गाजर, मक्याचे दाणे घालून चांगले परतावे.
- 5
सर्वात शेवटी कोळंबी घालून मिक्स करून घ्या. भांड्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजू द्या. शिजल्यावर त्यात वरील सर्व मसाले म्हणजे लाल तिखट, हळद, जिरेपूड, धणेपूड, गरम मसाला, मीठ घालून चांगले एकत्र करा.
- 6
ह्या शिजवलेल्या भाज्या मध्ये आता शिजलेला भात घाला आणि नीट मिक्स करा. वरून पातीचा चिरलेला कांदा घाला. आवडत असेल तर सर्वात शेवटी एक टीस्पून चिंग चायनिज मसाला घाला. आता भांड्यावर झाकण ठेवून 5 मिनिटे अगदी लहान आचेवर वाफ काढा.
- 7
बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालून वाफाळता कोळंबी भात सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या