केळफुलाची पानगी (खोल्यातली केळ फुलाची रोटी)(kel-fulachi pangi recipe in marathi)

#रेसिपीबुक #गावाकडच्या_आठवणी
पानगी हा प्रकार मला नेहमी भूतकाळात घेऊन जातो. माझी आजी उत्तम पानगी बनवायची. केळीच्या पानाला आमच्या गावी खोला म्हटलं जाते. माझी आई या रोटीचे अनेक प्रकार करायची मेथीची, केळफुलाची, बोंबलाची, करंदीची(छोटी ओली कोळंबी) गुळाची, नारळाची, काकडीची... गोड-तिखट, वेज - नॉन वेज अश्या दोन्ही चवीची. शक्यतो रात्री जेवण झाले की चुलीवर तवा ठेवून त्यावर केळीच्या पानात थापायची आणि मंद विस्तवावर खरपूस भाजून झाकून ठेवायची. मग सकाळी मस्त न्याहारीला खायची. मस्त स्मोकी फ्लेवर यायचा 😋😋😋 आता चुलीवर नाही करता आली म्हणून गॅस वर केली, छानच झाली पण आजीची आणि आईच्या हातची सर नाही. अजूनही आईकडे गेली की मी हमखास करून मागते खोल्याची रोटी.

कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी केळफूल साफ करून आतील पिवळसर फुले काढून घ्या. स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. कांदा, मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घ्या. ओला नारळ खवून घ्या.
- 2
एका भांड्यात वरील चिरलेल्या भाज्या, मीठ, हळद, तेल, तांदूळ व बेसन पीठ एकत्र करून कालवून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घालून साधारण सैल मळून घ्या.
- 3
आता केळीच्या पानावर हे पीठ हाताने थोडे पाणी लावून थापून घ्या. ह्या पाना खाली आणखी एक पान ठेवा. आणि मग दोन्ही पाने सावकाश उचलून तापलेल्या तव्यावर ठेवा. वरून आणखी दोन पाने ठेवून झाकून घ्या.
- 4
एका बाजूने 5 मिनिटे खरपूस भाजले की उलटून दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्या.
- 5
झाली पानगी तय्यार! आहे की नाही झटपट आणि सोप्पी. आता याचे तुकडे करा आणि चहा सोबत किंवा चटणी /सॉस सोबत खायला द्या.
- 6
नंतर वरचे पान काढून पुन्हा एकदा तव्यावर थोडे भाजून घ्या. छान सोनेरी रंग येईल दोन्ही बाजूने.झाली
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (5)