तांदळाची भाकरी (tandalachi bhakari recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये मीठ, तांदळाचे पीठ टाकून चांगले ढवळून घ्या गॅस बंद करा. दहा ते पंधरा मिनिटात पीठ चांगलं झाकण लावून वाफवण्यास ठेवावे.
- 2
पंधरा मिनिटे झाल्यानंतर पीठ चांगले रगडून मळून घ्यावे. एकही गुठळी राहता कामा नये. पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यावा. भागवलेल्या पिठासाठी पाणी लागत नाही. पण जर तुम्हाला पीठ कोरडे वाटत असेल तर पाण्याचा हबका मारून पीठ मळून घ्या. पिठाला गोळा करताना तडा जात नसेल म्हणजे आपले पीठ बरोबर मळून झालेले आहे. तांदळाच्या भाकरीला तडेही जाणार नाहीत याची खातरजमा होते.
- 3
आता गरजेपुरती तांदळाचे कोरडे पीठ घेऊन तांदळाच्या पिठाची उकड घेऊन भाकरी पोळपाटावरती पोळी प्रमाणे लाटून घ्या. गॅस वरती तवा तापत ठेवा. तवा चांगला तापल्यावरती मंद आचेवरती भाकरी खरपूस भाजून घ्या. भाकरी टाकताच त्यावर पाण्याचा हात लावावा एक ते दोन मिनिटे वाफवून मगच भाकरी परतावी जेणेकरून भाकरीत मऊसरपणा येऊन भाकरी खरपूस भाजली जाते. भागवलेल्या पिठापासून मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes













टिप्पण्या