सातारी तडका मिसळ (misal recipe in marathi)

#रेसिपीबुक #week2
मिसळ.... मिसळ म्हटलं की प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र मध्ये मिसळ वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. गावाकडच्या आठवणी मध्ये मिसळ हे माझ्या एक आठवणीतला पदार्थ आहे. मुंबईच्या बाहेर निघालो की मग आपल्याला गावाकडच्या मातीचा सुंदर सुगंध येऊ लागतो.
मी साताऱ्याची, घाटमाथ्यावरच्या आमचं गाव. औंध शेजारी एक छोटसं गाव.माझ्या बाबांच्या वडिलांना म्हणजे आमच्या आजोबांना तर मी पाहिलेच नाही आणि माझी आजी बाबांची आई मी खूप लहान होते तेव्हाच देवाघरी गेली पण आई मला तिच्या गोष्टी सांगते की माझ्या लहानपणी कशी ती मला कडेवर घेऊन चॉकलेट गोळ्या द्यायची, माझे खूप लाड करायची एवढीच काय ती माझी आजी बरोबर ची आठवण.
फेब्रुवारी महिन्यात आम्ही गावाला जत्रेला जायचो. पहाटे लवकर घरातून निघायचं म्हणजे दुपारी जेवणासाठी घरी पोहोचायचं. गावाला निघताना आमची धांदल असायची हे घेऊ का ते घेऊन.गावाला काय मज्जा करायची मी आणि माझा मोठा भाऊ ठरवायचं. सकाळी लवकर निघायचो मग काही खाणे व्हायचे नाही. मग बाबा गाडी थांबवुन एखादा चांगला हॉटेल पाहून तिकडे आम्ही नाश्ता करायला थांबायचो.
गावाकडचा सकाळचा नाष्टा म्हणजे गरमागरम कांदा भजी, बटाटा वडे, पोहे उपमा. आणि त्यातलाच एक खमंग पदार्थ मला खूप आवडायचा म्हणजे मिसळपाव इत्यादी. मटकीची तरी दार उसळ त्याच्यावरती खमंग शेव फाफडा चे फरसाण, फरसाण मिसळीच्या तरी मध्ये मिसळून जाते त्यावर ती बारीक कापलेला कांदा, हिरवीगार कोथिंबीर आणि वरून लिंबाचा रस रशीद रस आहा आहा...
काय मंडळी तोंडाला पाणी सुटले ना. चला मग तीच खमंग मिसळ बनवूया.

कुकिंग सूचना
- 1
चला तर मग बनवूया खमंग अशी मिसळ. ही मिसळ मी माझ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केला आहे.एका कढईमध्ये खवलेले सुके खोबरे छान खरपूस लाल हॉइस्त भाजून घेऊन बाजूला ठेवा. त्याच पॅन मध्ये तेल टाकून त्यात उभा चिरलेला कांदा गुलाबी होइस्तव परतुन घ्या मग त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आलं आणि टोमॅटोचे काप टाकून छान मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्या. मसाला थोडा थंड करून मिक्सर मध्ये त्याची अंगठी बारीक पातळ पेस्ट वाटून घ्या.
- 2
कुकर मध्ये एक चमचा तेल टाकून त्यामध्ये हळद आणि हिंग खोलीला द्यावे त्यामध्ये मोड आलेली मटकी टाकून परतून घेऊन दोन ग्लास पाणी टाकून अर्धा टीस्पून मीठ टाकून त्याची एक ते दोन शिट्या काढून घ्याव्या.
- 3
कुकरला शिजवून तळ मटकी खाली दिलेल्या चित्रासारखे दिसून येईल.
- 4
मग कढईमध्ये तीन ते चार टेबलस्पून तेल टाकून वाटलेला वरील मसाला टाकावा व त्याला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यावा या मसाल्यामध्ये शिजवलेली मटकी मिक्स करावी त्यामध्ये गोडा मसाला लाल तिखट धण्याची पूड व चवीप्रमाणे मीठ टाकून थोडी परतून घ्यावी आपल्या आवश्यकतेनुसार त्या मध्ये पाणी टाकावे.तुम्हाला तरी उसळी मदत करायची असेल तर पाणी थोडे जास्त टाकावे नाहीतर तरी तुम्ही वरील मसाला वापरून वेगळी करू शकता.
- 5
उसळीला छान उकळी आली, तेलाचा तवंग दिसला की उसळ झाली असे समजावे.
- 6
आता ही उसळ प्लेट मध्ये काढावी. त्या वर खमंग फरसाण लाल चुटुक तरी. बारीक चिरलेला कांदा हिरवीगार कोथिंबीर आणि लिंबाचा रस जोडीला आपली बटाटा पिवळी भाजी मस्त नरम नरम पावाबरोबर आस्वाद घ्यावा. आणखी काय हवे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या