चवळीची उसळ (chavalichi usal recipe in marathi)

#रेसिपीबुक गावाकडची आठवण रेसिपी 2
चवळीची उसळ आणि भात एकदम भारी बेत.गरम गरम खायला खूप छान लागते.
चवळीची उसळ (chavalichi usal recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची आठवण रेसिपी 2
चवळीची उसळ आणि भात एकदम भारी बेत.गरम गरम खायला खूप छान लागते.
कुकिंग सूचना
- 1
चवळी आदल्या दिवशी रात्री पाण्यात भिजत ठेवा.
- 2
सकाळी कुकरला 2 शिट्टी देऊन शिजवून घ्या.
- 3
खोबरं, लसूण, कोथिंबीर ओबड धोबड बारीक करा. ते 1चमचा काढून ठेवा.
- 4
तेच वाटण पुन्हा थोडं पाणी घालून पूर्ण बारीक करा.
- 5
टोमॅटो बारीक कट करा.
- 6
आता कढईत तेल तापायला ठेवा.
- 7
त्यात आधी कडीपत्ता टाका. जिरे, हिंग हळद टाका.
- 8
ओबड धोबड बारीक केलेला आणि पूर्ण बारीक केलेला हिरवा मसाला टाकून तेल सुटेपरेंत परतावा.
- 9
2 ते 3 चमचे लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला टाका. 1/2 मिनिट परता.(चवी नुसार तिखट कमी जास्त टाका.)
- 10
आता शिजवलेली चवळी टाका. चवी नुसार मीठ टाका. एक उकळी आली कि गॅस बंद करा.
- 11
कोथिंबीर बारीक कट करून वरून टाका.
Keywords
Similar Recipes
More Recipes










टिप्पण्या