आंबट गोड  वरण (ambat god varan  recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#रेसिपीबुक
#खाटी #week2 रेसिपी बुक या माझ्या सखीने सांगितलेल्या *गावाकडच्या आठवणी* या पुष्पातील दुसरी गोड आठवण ...माझ्या आजोळची..मामाच्या गावाची..मामाचा गाव हा आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय...माझं आजोळ *कडूस* पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक छोटंस, सुंदर गांव..मनाचा हळवा कोपराच..सुट्टया लागल्या की आम्ही चाललो मामाच्या गावाला..टुमदार वाडे, गल्लीबोळातले रस्ते, निसर्गरम्य परिसर, चहुबाजूंनी शेती, जिल्हा परिषदेची शाळा..सगळं काही उत्साहाला प्रेरित करणारं..
आमच्या कडूसचे पंचक्रोशीतील प्रसिद्ध श्री पांडुरंग देवस्थान🙏...गेली ३७४ वर्ष येथे माघ शुद्ध दशमी ते माघ शुद्ध पौर्णिमा हे सहा दिवस श्री पांडुरंगाचा उत्सव अव्याहतपणे सुरू आहे.तुकाराम महाराजांनी या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली.ते २८ वर्ष या उत्सवाला येत होते. दहा दिवसात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काकड आरती होत नाही..कारण तुकाराम महाराजांच्या विनंतीनुसार प्रत्यक्ष पांडुरंग येथे विश्रांती घेतात..महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातून पण भाविक दर्शनासाठी येतात ‌‌..त्यांच्यासाठी अन्नछत्र चालू आहे..हजारो भाविक पंगतीचा लाभ घेतात..अशा या उत्सव काळातील पंगतीतील एक अविभाज्य पदार्थ म्हणजे *खाटी*...अर्थात आंबट गोड वरण..ज्याची चव केवळ अलौकिकच...भात पोळी बरोबर खाल्ली जाते..*खट्टी* या शब्दाचा अपभ्रंश होऊन *खाटी* म्हणत असावेत..खाटी..खाटी..खाटी...असं म्हणत वाढायचं शास्त्र आहे ते...😄आणि पानात पडताच खाटी ओरपताना तिचे ओघोळ हातातल्या कोपरापर्यंत जावेच लागतात...चला तर मग सुरू करुया आजची रेसिपी...😊4..#खाटीअर्थात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनीटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कप तूरडाळ
  2. 1बटाटा
  3. 2शेवगा शेंगा
  4. 4-5 टीस्पूनचिंचेचा कोळ
  5. 2 टीस्पून गूळ
  6. 2 टीस्पूनतिखट
  7. 2 टीस्पून गोडा मसाला
  8. 7-8कडिपत्ता पाने
  9. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  10. चवीनुसारमीठ
  11. फोडणीचे साहित्य
  12. 2 टीस्पूनतेल
  13. 1वांग (ऐच्छिक)
  14. 4 कपपाणी

कुकिंग सूचना

15-20 मिनीटे
  1. 1

    प्रथम तूरडाळ शिजवून घ्या..रवीने चांगली घोटून घ्या.बटाटे,वांग्याच्या फोडी अर्धवट उकडून घ्या.शेवगा शेंगा मीठ घालून उकडून घ्या.

  2. 2

    गॅस वर कढई ठेवून त्यात तेल घाला..तेल तापलं की मोहरी,जिरं घाला..मोहरी तडतडली की हिंग घाला, किंचित हळद घाला.कडिपत्ता घाला आता..शिजवलेलं वरण फोडणीवर घाला..

  3. 3

    आता वरणामध्ये पाणी शक्यतो गरम घाला.. अर्धवट उकडलेले बटाटे,वांग,शेवगा शेंगा घाला..खळखळून उकळू द्या..

  4. 4

    आता यात तिखट,मीठ,गोडा मसाला,चिंचेचा कोळ,गूळ घालून उकळून द्या.. चवीनुसार मीठ घालावे..वरुन कोथिंबीर घालून सर्व्ह करा गरमागरम खाटी..

  5. 5
  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या

Mrs.Rupali Ananta Tale
Mrs.Rupali Ananta Tale @cook_21129734
आंबटगोड वरन
#रेसिपीबुक अस लिहा
समोर गोष्ट लिहा
एवढे # नको

Similar Recipes