मराठवाडा फेमस धपाटे (dhapate recipe in marathi)

#रेसिपीबुक week2 #रेसिपी3
माझे जन्मगाव औरंगाबाद असले तरी आमचे मुळ गाव जवळचेच फुलंब्री हे गाव असल्याने आज्जी आजोबा नेहमीच गावी जाऊन येऊन असत. मराठवाड्यात ज्वारीचे पीक जास्त घेतले जाते त्यामुळे ज्वारीचा उपयोग ही जास्त. आमच्या गावी खंडोबाची यात्रा असताना आम्ही सगळे गावी रहायला जायचो तेव्हा जत्रेच्या आदल्या दिवशी येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना हे धपाटे, लोणच व खोबर लसणाची चटणी असा साधाच पण चविष्ट बेत असायचा.हे धपाटे पाठीत धपाटा घालतो तसेच थापुन करतात म्हणुन ह्यांना धपाटे म्हणत असावे😍😁😋😋 मी ही रेसिपी फुडप्रोसेसर मधे बनवली
#गावकडच्या आठवणी #रेसिपीबुक
#रेसिपी3

कुकिंग सूचना
- 1
फुडप्रोसेसर मधे ज्वारीचे पीठ,कणीक,तांदळाचे पीठ एकत्र करून त्यात हळद,मीठ,तिखट,ओवा,चिरलेली कोथिंबीर घालून गरजेनुसार पाणी घालून घट्ट पीठ भिजवून घ्यावे.
- 2
तयार पीठ जरावेळ मुरू द्यावे.
- 3
पीठाचा छोटा गोळा घेऊन थोडे कोरडे पीठ पसरवुन त्यावर गोळा थापुन पातळ धपाटे थापुन घ्यावे. तव्यावर तेल टाकून धपाटे खरपुस भाजुन घ्यावे.
- 4
तयार धपाटे गरम किंवा थंड लोणच,खोबर चटणीबरोबर वाढावे. गावाकडचे स्वच्छ वातावरण आणि गावाकडचे प्रेमळ लोक तर आता नाहीत पण तो गावरान बेत मात्र आम्ही आनंदाने खाल्ला😊😋
Keywords
Similar Recipes
More Recipes
- उरलेल्या पोळ्यांचा / चपाती/रोटी चा नाश्ता (policha nashta recipe in marathi)
- कैरीचे आंबट तिखट गोड लोणचे (kairiche ambat god lonche recipe in marathi)
- आंबट गोड वरण (ambat god varan recipe in marathi)
- मुग वडे भाजी (moong wade bhaaji recipe in marathi)
- शेंगदाणा चटणी(shengdana chutney recipe in marathi)

टिप्पण्या