कटला फिशकरी (cutala fish curry recipe in marathi)

#रेसिपीबुक #week4 रेसिपी 1माझे आवडते पर्यटन स्थळ म्हणजे सातारा मधले कन्हेरे धरण.आणि येथील धरणातले मासे. खूप प्रकाचे मासे इथे मिळतात त्यातल्याच एका प्रकारच्या माशाची रेसिपी आहे ही.

कुकिंग सूचना
- 1
मासे 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धून त्याला मीठ, हळद, आमसूल व लिंबू लावून 10 मिनिट ठेवा
- 2
मिक्सर मध्ये खोबरं, लसूण, आलं, जिरं आणि पुदिना, कोथिंबीर एकत्र बारीक करून हिरवा मसाला तयार करून घ्या.
- 3
कढई मध्ये तेल कोमट झालेकी 1/2 चमचा लाल चटणी टाका.
- 4
आता हिरवा मसाला व 2 टीस्पून लाल तिखट टाकून त्याला तेल सुटे परियंत भाजा.
- 5
मासे त्यात घालून 1/2 मिनिट परता.
- 6
लगेचच त्यात अर्धा लिटर पाणी ओता.
- 7
रस्साला उकळी आल्या नंतर 15 मिनिटांनी गॅस बंद करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या