व्हेज बर्गर (veg burger recipe in marathi)

Veena Suki Bobhate
Veena Suki Bobhate @cook_21535037
Kolhapur

#रेसिपीबुक #week4 बर्गर तसा बागायला गेल तर भारतातला नाही. तो प्रत्येक देशात, आणि प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो.
आता ह्याची आठवण म्हणजे मी आणि माझे मिस्टर रविवारी संध्याकाळी जेव्हा फिरायला जायचो तेव्हा इथल्या गार्डन ला लागून असलेल्या शॉप मध्ये घ्यायचो आता लॉकडाऊन मुळे जाणे शक्य नाही. म्हटलं घरीच बनवूया. बर्गर कसा करायचा ते पाहू.

व्हेज बर्गर (veg burger recipe in marathi)

#रेसिपीबुक #week4 बर्गर तसा बागायला गेल तर भारतातला नाही. तो प्रत्येक देशात, आणि प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो.
आता ह्याची आठवण म्हणजे मी आणि माझे मिस्टर रविवारी संध्याकाळी जेव्हा फिरायला जायचो तेव्हा इथल्या गार्डन ला लागून असलेल्या शॉप मध्ये घ्यायचो आता लॉकडाऊन मुळे जाणे शक्य नाही. म्हटलं घरीच बनवूया. बर्गर कसा करायचा ते पाहू.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनिट
5 व्यक्ती
  1. व्हेज बर्गर टिक्की साठी
  2. 3माध्यम आकाराचे बटाटे
  3. 1 वाटीकॉर्न वाफवलेले
  4. 1/2 वाटीफ्लॉवर वाफवलेले
  5. 1/2 वाटीबारीक चिरलेला कोबी
  6. 1/4 टीस्पूनजिरं पावडर
  7. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. 1/2 टीस्पूनमिरची पावडर
  10. 1/4 टीस्पूनचाट मसाला
  11. 1/2 टेबलस्पूनमीठ
  12. कोथिंबीर
  13. 1/2 कपब्रेड क्रमस
  14. चिझ
  15. टिक्की बाहेरून बाईंडिंग करण्यासाठी
  16. 2 टीस्पूनकॉर्नफ्लॉवर
  17. 1/4 टीस्पूनमैदा
  18. 1/2 टीस्पूनमिरी पावडर
  19. 1/2 टीस्पूनमीठ
  20. 1/2 कपपाणी
  21. 1/2 वाटीब्रेड क्रमस
  22. बर्गर सॉस साठी
  23. 3 टेबलस्पूनएगलेस मेयोनीस
  24. 2 टेबलस्पूनटॉमेटो सॉस
  25. 1 टेबलस्पूनचीली सॉस
  26. 5बर्गर बन
  27. 5चिझ स्लाइस
  28. 10टॉमेटो स्लाइस
  29. 10कांदा स्लाइस

कुकिंग सूचना

30-40 मिनिट
  1. 1

    सर्व साहित्य घेवू

  2. 2

    सर्व प्रथम बटाटे किसून घेवू त्यात बर्गर साठी दिलेली साहित्य मिक्स करून घेवू. त्या नंतर व्यवस्थित गोळा करून घेवू. त्याचे बर्गर बन च्या आकाराचे टिक्की बनवून घेवू.

  3. 3

    बाईंडिंग साठी घेतलेले साहित्य मिक्स करून घेवू तयार टिक्की बाईंडिंग मिश्रण मध्ये बुडून ब्रेड क्रमस मध्ये घोळवून घेवू.

  4. 4

    एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात तयार टिक्की दोन्ही बाजूंनी छान भाजून घेवू

  5. 5

    आता बर्गर सॉस तयार करून घेवू वर दिल्याप्रमाणे साहित्य घेवून सॉस तयार करून घेवू.

  6. 6

    आता बर्गर थर लाऊन तयार करू. सर्व प्रथम बर्गर बन मधून कट करुन घेवू. वाटल्यास तुम्ही तो थोडा फ्राय करून घेवू शकता हलकाच. बन चा खालचा भाग ठेवून त्यावर तयार सॉस लावून घ्या, त्यावर टिक्क ठेवा, त्यावर चिझ स्लाइस ठेवा, त्यावर टॉमेटो स्लाइस, त्यावर कांदा स्लाइस, जरा चाट मसाला भुरभुरा, त्यावर बन चा वरचा भाग तयार सॉस लावून ठेवा. तयार व्हेज बर्गर.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Veena Suki Bobhate
Veena Suki Bobhate @cook_21535037
रोजी
Kolhapur

Similar Recipes