कापण्या (kaapnya recipe in marathi)
#फोटोग्राफी क्लास
#cookpadmarathi
कुकिंग सूचना
- 1
१ वाटी गुळाचे पाणी घालून वितळून पाणी करून घ्यावे
- 2
कापण्या साठी लागणारे साहित्य एका डिश मध्ये काढून घेतले. बडीशेप मिक्सर मधून रवाळ दळून घ्यावी. परातीत गव्हाचे पीठ घेऊन त्यात सर्व साहित्य एकत्र करून कढईत तेल गरम करून त्यावर मोहन घालून चांगले मिक्स करून घ्यावे.
- 3
गुळाच्या पाण्यात भिजवून मऊ लुसलुशीत झाल्यावर २५-३० मि. झाकूण ठेवावे.नंतर ३-४ गोळे करून पोळी लाटून घ्या.
- 4
पोळी लाटून झाल्यावर वरून खसखस व तीळ पसरवून पुन्हा लाटणे फिरवावे म्हणजे तीळ खसखस पोळीत दाबली जावून तळताना तेलात पडणार नाही.पोळी लाटून झाल्यावर फिरकी ने कापून घ्यावे. तेलात तळून घ्यावे.
- 5
सर्व तळून घ्यावेत. व सर्व्ह करावे खायला छान पौष्टिक गोड अन् खुसखुशीत होतात. बेसन ऐवजी रवा किंवा बाजरी चे पीठही घालू शकतो.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13116035



















टिप्पण्या (2)