आलू स्टफड मिरची भजे (aloo stuffed mirchi bhaji recipe in marathi)

Sarita B.
Sarita B. @cook_23569819

#रेसिपीबुक #week5
पाऊस पडला नाही की गरमागरम आणि चविष्ट पदार्थांची डिमांड माझ्या कुटुंबातील सदस्य नेहमीच करीत असतात. मिरची ही प्रत्येक घरात उपलब्ध असतेच, म्हणून कमी वेळेत आणि कमी साहित्य वापरून तयार केलेले मिरची भजे ची रेसिपी शिकूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 4ते 5 हिरव्या मिरच्या
  2. 1उकडलेला आलू
  3. 1 वाटीबेसन
  4. 1 चम्मचधणेजिरे पूड
  5. चिमूटभरसोडा
  6. चवीनुसारमीठ
  7. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम मिरची धुवून मधोमध कापून घ्यावे. एका प्लेटमध्ये आलू कुस्करून त्यात धणेजिरे पूड आणि मीठ घालून मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    तयार केलेले मिश्रण मिरची मध्ये स्टफड करून घ्यावे. आता एका भांड्यात बेसन, मीठ, सोडा आणि थोडे पाणी घालून मिक्स करून त्याचे पातळ असे बॅटर तयार करून घ्यावे.

  3. 3

    एका कढई मध्ये तेल तापत ठेवावे. स्टफड केलेल्या मिरच्या बेसन च्या बॅटर मध्ये बुडवून तेलात तळून घ्यावे. गरमागरम मिरची भजे सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sarita B.
Sarita B. @cook_23569819
रोजी

Similar Recipes