ढोकळा (dhokla recipe in marathi)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#Cooksnap
मी Maya Bawane Damai याची ढोकळा ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खरतर ढोकळा मला आवडतो पण घरी करायला जमला नाही. एकदा ट्राय केला पण बसलाच... फुगलाच नाही त्यामुळे पुन्हा कधी करायचा प्रयत्नच केला नाही... पण आता कुकस्नॅपच्या निमित्ताने पुन्हा प्रयत्न केला...
फक्त यात एक ingredient add केला आहे... 😁 खूपच मस्त झालाय ढोकळा... thank you so much Maya mam for this recipe... 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻😊😊

ढोकळा (dhokla recipe in marathi)

#Cooksnap
मी Maya Bawane Damai याची ढोकळा ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खरतर ढोकळा मला आवडतो पण घरी करायला जमला नाही. एकदा ट्राय केला पण बसलाच... फुगलाच नाही त्यामुळे पुन्हा कधी करायचा प्रयत्नच केला नाही... पण आता कुकस्नॅपच्या निमित्ताने पुन्हा प्रयत्न केला...
फक्त यात एक ingredient add केला आहे... 😁 खूपच मस्त झालाय ढोकळा... thank you so much Maya mam for this recipe... 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻😊😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
4 व्यक्तींसाठी
  1. 🔶️ढोकळासाठी साहित्य
  2. 1 वाटीबेसन
  3. 3/4 वाटीरवा
  4. 1 वाटीपाणी
  5. 2टेबलस्पून तेल
  6. 3टेबलस्पून साखर
  7. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  8. 1 टीस्पूनखायचा सोडा
  9. 1/2टेबलस्पून सायट्रिक acid
  10. 1 टीस्पूनहळद
  11. 1/2टेबलस्पून आले लसूण पेस्ट
  12. मीठ चवीनुसार
  13. 🔶️फोडणीसाठी साहित्य
  14. 1 टीस्पूनजीरे आणि मोहरी
  15. 1/2 ट स्पूनहिंग
  16. 5-6कडिपत्ता पाने
  17. 3-4हिरव्या मिरच्या बारिक चिरलेल्या
  18. 1/2टेबलस्पून साखर
  19. बारिक चिरलेली कोथिंबीर
  20. 1टेबलस्पून तेल
  21. 2 वाटीपाणी

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    आधी मोठ्या कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचे. ढोकळा ज्या भांड्यात बनवायचा त्या भांड्याला तेल लावून ठेवायचे. त्यात स्टॅन्ड ठेवायचे. सर्व साहित्य तयार करून ठेवायचे. मगच ढोकळा बनवायला घ्यायचा.

  2. 2

    आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये बेसन, रवा, सायट्रिक ऑसिड, मीठ, साखर, आले लसूण पेस्ट, हळद आणि 1 वाटी पाणी घालून फेटायचे. मग त्यात तेल घालून पुन्हा फेटायचे. आता त्यात बेकिंग पावडर घालायची आणि एका वाटीत थोडेसे पाणी घेऊन त्यात सोडा घालायचा. हे सोड्याचे पाणी मिश्रणात घालत घालत फेटायचे आणि पटकन तेल लावलेल्या भांड्यात मिश्रण ओतून भांडे कढईत ठेवायचे आणि झाकण लावून 15 ते 20 मिनिटे स्टिम द्यायची.

  3. 3

    आता फोडणीसाठी एका भांड्यात तेल गरम करून त्यात हिंग, जीरे, मोहरी, कडिपत्ता, हिरवी मिरची, साखर, त्यातील थोडी कोथिंबीर घाला आणि आता यात 2 वाटी पाणी घालून एक उकळी आली की गॅस बंद करा.

  4. 4

    15-20 मिनिटांनी टूथपिकन घालून चेक करा ढोकळा झालाय का ते. झाला असल्यास काढून थोडा थंड होऊ द्या. मग त्याचे काप करून ठेवा आणि त्यावर ते फोडणीचे पाणी सगळीकडे चमच्याने ओता. वर कोथिंबीर पण घाला.

  5. 5

    खायला तयार आहे आपला ढोकळा... 😍😍😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes