पापलेट यलो करी (paplet yellow curry in marathi)

गोवा हे माझे पर्यटनासाठी आवडते राज्य आहे.गोव्याचे निसर्ग सौंदर्य, समुद्र किनारे,देवळे, चर्चेस,बॅकवॉटर्स, मयेम लेक ,हरवाळ्याचा धबधबा,आग्वाद किल्ला,विशेषतः मिरामार आणि डोना पावलाचे समुद्रकिनार,पणजीे आणि म्हापसा शहरे,त्यातली मार्केटस् मला खूप आवडतात.दर दोन वर्षांनी आम्ही गोवयला जातोच.
गोव्यातले जेवणही माझ्यासाठी खास पर्वणी असते.पोर्तुगीज राजवटीचा तिथल्या खाद्यसंस्कृतीवर तगडा पगडा आहे. आंबोटिक, रेश्याद,विंदालू असे विशिष्ट प्रकार ही गोव्याची खासियत.काही छोट्या छोट्या घरगुती खाणावळीतून मिळणारं चविष्ट जेवण आणि तिथली खास यलो करी मला अतिशय आवडते. चवीला जितकी अव्वल तितकीच दिसायलाही सुरेख! 1981 मध्ये सर्किट हाऊसच्या खानसाम्याकडून ही पाककृती मी मिळवली आणि तेव्हापासून ती माझ्या स्वयंपाकघरातल्या हिट लिस्टवर आहे.
यात आंबटपणासाठी कैरी वापरली आहे,सीझन नसेल तेव्हा आंबोशी किंवा लिंबूरस वापरायचा.कोकम किंवा चिंच मारायची नाही आणि पांढरी मिरीच वापरायची कारण काळी मिरी वापरली तर करीचा रंग बिघडतो,ही त्या खानसामांची खास सुचवणी होती.त्याप्रमाणेच मी करते,
करून पहा,तुम्हालाही आवडेल.
घ्या तर साहित्य जमवायला

कुकिंग सूचना
- 1
खोबऱ्यात हळद,धणेपूड, पांढरी मिरी,जिरे आणि कोमट पाणी घाला.
- 2
एक वाटी जाड आणि तीन वाट्या पातळ दूध काढा.
- 3
तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्यावा.
टोमॅटो घालून परतून घ्या. - 4
खोबऱ्याचे पातळ दूध घालून उकळी येईपर्यंत ढवळत रहा.
- 5
,पापलेटचे तुकडे घालून शिजू द्या.
- 6
कैरीचे तुकडे,हिरव्या मिरच्यांचे तुकडे व मीठ घाला.शेवटी खोबऱ्याचे घट्ट दूध घालून एक उकळी येईपर्यंत ढवळत रहा.
- 7
गरमागरम वाफाळत्या भातासोबत आस्वाद घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या