शेगांव कचोरी (kachori recipe in marathi)

यात मी सुखा हिरवा वाटाणा आणि बेसन चा सारणासाठी वापर केला आहे.
शेगांव कचोरी (kachori recipe in marathi)
यात मी सुखा हिरवा वाटाणा आणि बेसन चा सारणासाठी वापर केला आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 1 वाटी सुखा हिरवा वाटाणा 1 तास भिजत ठेवून नंतर शिजवून घ्या. शिजवून घेतलेला वाटाणा मिक्सर मध्ये वाटून घ्या.
- 2
प्रथम 1 कप मैदा,3/4वाटी गव्हाचे पीठ,6 टेबल स्पून तेल आणि चवीनुसार मिठ टाकून छान मिक्स करून घेणे आता थोडे थोडे पाणी घालून छान मऊसर कणिक मळुन घ्या. आणि 1/2 तास झाकून ठेवा.
- 3
सारणा साठी प्रथम बडीशेप, जिरे, धणे पॅन मध्ये सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या.आणि मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या. लसूण आणि मिरचीची जाडसर पेस्ट करा.
- 4
आता गॅस वर पॅन ठेवून पॅन मध्ये 2 टेबल स्पून तेल गरम करा आणि तयार केलेली लसूण आणि मिरचीची पेस्ट टाका नंतर लाल तिखट, हळद आणि गरम मसाला ॲड करा 2 मिनट परतून घ्यावे आता बेसन ॲड करा आता बडीशेप, जिरे, धणे पुड आणि आमचुर पावडर ॲड करा आणि परता आता तयार केलेली वाटाणा पेस्ट ॲड करा चवीनुसार मिठ टाकून छान मिक्स करून घेणे 3 टेबल स्पून पाणी घालून 5 मिनट वाफवून घेणे. सारण छान मोकळे होते वरून चिरून कोथिंबीर टाकून घेणे.
- 5
कचोरी साठी तयार केलेली कणिक घेउन छोटे गोळे करा. या गोळ्यात तयार केलेले सारण भरा आणि थोडे लाटा. शेगांव कचोरी थोडीशी पातळ असते जास्त फुगलेली नसते.
- 6
आता पॅन मध्ये तेल गरम करून कचोरी छान खरपूस तळून घ्या. आपली कचोरी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेगांव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी माझा आवडता पदार्थ आहे मग ती साधी असो, फराळी असो की लोकप्रिय शेगांव कचोरी. कचोरी करताना सर्वात महत्त्वाचे सारण आणि तिचा खुसखुशीत पणा.. आजची रेसिपी माझी नाही यू ट्यूब आणि २-३ ठिकाणी वाचून मी त्यात थोडा बदल करून.कचोरी केली. अप्रतिम झाली, धन्यवाद अंजलीताई आणि धनश्री ताई ज्यांच्या रेसिपी मी आधार म्हणून वापरल्या.Pradnya Purandare
-
शेगाव कचोरी (shegaon kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मी लहानपणापासून नेहमीच शेगाव ला जात असते गजानन महाराजांचा दर्शनासाठी, तिथली कचोरी प्रसिद्ध आहे,मला खूप आवडते ह्या आठवड्यात थीम मुळे मी करून पाहीली,धन्यवाद cookpad Mansi Patwari -
कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी जेव्हा पासून नेहा मॅम नी पिझ्झा बेस गव्हाच्या पीठाचा करून दाखवला तेव्हा पासून मैदा गरजेपुरता वापरते. आज कचोरी हि गव्हाच्या पीठाचा वापर करून केली.मस्त खुसखुशीत झाली आहे. Shubhangee Kumbhar -
-
कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपीजसगळ्यांची आवडती कचोरी, यात किती तरी प्रकार आहेत, पण आज थोडी वेगळी केली. एरवी कॉर्न समोसा करतो पण आज म्हंटलं कचोरी करूया. पण काय करायला जितका वेळ लागला, फस्त करायला तेवढा वेळ पण नाही लागला... Sampada Shrungarpure -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी कचोरी ही वेगवेगळ्या शहर व राज्याची वैशिष्ट्ये म्हणून त्या नावाने ओळखली जाते .प्रत्येक ठिकाणची कचोरी ही त्यात वापरलेला मसाला आणि आकार यामुळे ओळखली जाते.राजस्थानी कचोरी ही आकाराने मोठी व टम्म फुगलेली असते तरशेगाव ची कचोरी ही बेसन वापरून केली जाते व आकार खुप फुगलेला नसुन थोडी चपटी असते. Bharti R Sonawane -
इंदोरी कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसीपीबुक #Week4खाता रहे मेरा दिल है मी म्हणते की खिलाता रहे मेरा दिल मला सगळ्यांनाच वेगवेगळ्या रेसिपीज खायला घालायला खूप आवडत आणि त्यासाठी ज्या शहरात जाते त्या ठिकाणच्या तिकडचा लोकल फुड काय आहे हे मी नेहमी शोधत असते त्यातूनच इंदोर ला गेल्यावर ही कचोरी मी खाल्ली आणि तिथे बघून कशी केली हे बघीतले खूप सुंदर लागते आज तुम्ही त्याचा डेमो बघितलाच मग चला तर बनवूया Deepali dake Kulkarni -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपिबुक #week12 कचोरी आमच्या विदर्भात ही कचोरी एकदम प्रसिध्द आहे.त्यातही आमच्या घरी सर्वांना खूप आवडते ऑफिसमध्ये,शेजारी मैत्रिणीकडून खास आग्रह असतो , ऑर्डर्स पण असतात याचे.चवीला खूप उत्कृष्ठ .याला चटणी ची ही गरज नाही.हवितर मिरची तोंडी लावून खातात. Rohini Deshkar -
-
-
शेगाव कचोरी (Shegaon kachori recipe in marathi)
#फ्राईडशेगाव कचोरी हा शेगाव चा प्रतिष्ठित ब्रांड आहे.शेगावला दरवर्षी लाखो भाविक गजानन महाराजांचे दर्शन घ्यायला येतात आणि दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक ही कचोरी खाणयाचा मोह टाळू शकणार नाही.तर आज आपण तीच शेगाव स्पेशल कचोरी बघणार आहोत.Jyoti Ghuge
-
कचोरी (तुरीच्या दाण्यांची) (kachori recipe in marathi)
#EB2#WK 2विंटर स्पेशल रेसिपी कचोरी विविध भागात खाल्ली जाते.भारतात बर्याच प्रकार च्या कचोर्या मिळतात.प्याज कचोरी, मुंग दाल कचोरी, आलू कचोरी, मटार कचोरी, मिनी कचोरी...अश्या बर्याच......त्यात शेगाव कचोरी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.माझ्या घरी सगळ्यांना हा पदार्थ खूप आवडतो..विशेषतः मुलाला तर जीव की प्राण..त्याच्या साठी केलेली ही रेसिपी...बाजारात ताज्या तुरीच्या शेंगा दिसायला लागल्या आहेत..म्हणून तुरीच्या दाण्यांची कचोरी Try केली आहे. Rashmi Joshi -
मटर कचोरी(matar kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक#Week1 फादर्स डे'च्या निमित्ताने नवऱ्याला आणि मुलाला आवडतात म्हणून मटार कचोरी केली तर बघूया कशी करतात मटार कचोरी। Tejal Jangjod -
मुंग डाळ कचोरी (moogdal kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी मी पहिल्यांदा बनवलेली मुंग डाळ कचोरी तसे तर मी बाहेरची कचोरी खाते पण मला तशी आवडत नाही. पण मी बनवलेली कचोरी आज एकदम मस्त झाली आहे टेस्टी आणि हेल्दी पण मी मैद्याचे ठिकाणी कणकेचा वापर केला आहे आणि घरी असलेल्या सामग्री तसं काहीतरी जुगाड करून कचोरी तयार केली. पण खरंच मैत्रिणींनो एकदम मस्त झाली आहे तुम्ही पण करून पहा नक्की तुम्हाला पण आवडेल. Jaishri hate -
शेगाव कचोरी (shegaon kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 शेगाव माझे सासर. 2 वर्षा पूर्वी जाण्याचा योग आला. खूप मज्जा केली होती आम्ही.गजानन महाराजांचे मंदिर.तेथील स्वछता आणि हो आनंदसागर तर बघण्यासारखे आहेत तिथे. आणि हा तिथे मिळणारी कचोरी अहाहा! आज तीच बनवण्याचा प्रयत्न केला आहेत मी पण थोडेसे बदल करून हा Swara Chavan -
कोकोनट मटार कचोरी (coconut matar kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरीमार्केट मध्ये ताजा वाटाणा दिसला. तो घेतला व त्यात नारळाचा चव व इतर मसाले टाकून कोकोनट मटार कचोरी करायचे ठरवले.खूपच चविष्ट यम्मी डिश तयार झाली.चला पाहुयात. डिश कशी तयार केली ते ? Mangal Shah -
स्विट कॉर्न कचोरी (sweet corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #kachoriमक्याचे दाणे वापरून अनेक पदार्थ बनवले जातात. पावसाच्या हंगामात मका भरपूर प्रमाणात मिळतो. अशी मक्याचे दाणे भरून बनवलेली कचोरी Kirti Killedar -
-
-
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12विदर्भातील श्री संत गजानन महाराजांचे शेगावं म्हणून या संतनगरीची प्रचिती सातासमुद्रापार आहे. याशिवाय विदर्भाची पंढरी म्हणूनही शेगावची ओळख आहे. पण अजूनही एक गोष्ट अशी आहे की ज्यामुळे शेगावचं नाव आवर्जून घेतलं जातं..!..आणि ती म्हणजे "शेगाव कचोरी". आकाराने छोटीसी पण चव मात्र उत्कृष्ट आणि..लाजवाब स्मिता जाधव -
-
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12शेगाव कचोरी.कचोरी.. उत्तर भारतामध्ये याचं उगमस्थान..मुख्यतः राजस्थान हे कचोरीचे मूळ मानलं जातं...आणि मग तेथून कचोरीचं खूळ गुजरात,राजस्थान,दिल्ली,बंगाल,मध्यप्रदेश , महाराष्ट्र या राज्यांमध्ये पसरलं. राजस्थान, मध्यप्रदेश येथे राहणार्या लोकांच्या रक्तातून WBC,RBC , हिमोग्लोबिन यांच्या बरोबर कचोरी पण वाहत असते..इतकं कचोरी प्रेम की सकाळी उठले की नाश्त्याला कचोर्याच हादडल्या पाहिजेत हे इथलं शास्त्र आहे. आता देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाची कचोरी आणि त्याचे प्रकार खायला मिळतात. यामध्ये राज कचोरी, मावा कचोरी, कांदा कचोरी, नागौरी कचोरी, बनारस कचोरी, हिंग कचोरी याचा समावेश आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट्रात कचोरीचे नाव काढले तर एकच नाव ओठांवर येते...शेगाव कचोरी.. विदर्भाचा खजिन्यातला कोहिनूर हिरा आणि महाराष्ट्रातील पहिले ISO certificate मिळालेला पदार्थ म्हणजे शेगावची कचोरी शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर येतात संत गजानन महाराज,आनंदसागर आणि कचोरी.. गजानन महाराजांचे दर्शन झाल्यावर पाय आपोआपच कचोरी कडे वळतात...इतकी याची जबरदस्त क्रेझ आहे..या कचोरीची चव न चाखलेला माणूस विरळाच असेल.. तर अशा या बाहेरुन रुपवान असलेल्या आतून खमंग चवीचे गुपित राखणार्या महाराष्ट्राच्या शेगाव कचोरीचा माझ्या रेसिपीबुक मध्ये समावेश हवाच ..ही माझी खमंग खस्ता अशी इच्छा *कच* या मूळ शब्दापासून बनलेला कचोरी हा शब्द...याचा अर्थ बांधून ठेवणे...म्हणून मी तर असं म्हणेन की आपल्या खाद्यजीवनातील कचोरी नामक खमंग अध्यायाने आपल्या जिभेवर,मेंदूवर असं काही गारुड केलंय की आपण यात पू्र्णपणे गुरफटून गेलोत..याच्या वासात,चवीमध्ये.. कधीही न तुटणार्या रेशीमबंधात बांधले गेलोय.. Bhagyashree Lele -
हिरवी मटर कचोरी (hirve matar khachori recipe in maratahi)
#Healthydiet#winter specialहिरवा वाटाणा कचोरी खजूर चटणी किंवा चहासोबत अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट आहे. Sushma Sachin Sharma -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12आजची बाकरवडी मी खास माझ्या नवऱ्यासाठी बनविले आहे . यात मी बेसन पीठाचा वापर केलेला नाही, मी यात तूर दाळ आणि मसुर दाळ पीठाचा वापर केलेला आहे, Arati Wani -
शेगाव कचोरी
खूप खूप दिवसापासून शेगाव कचोरी खाण्याची इच्छा होते शेवटी मग काल फ्रीजमध्ये थोडे हिरवे वाटाणे सापडली मग काय रात्री भिजत घातले सकाळी उठून गरमागरम कचोऱ्या सगळ्यांना नाश्त्याला दिले. कचोरी आपण खूप प्रकारच्या खातो पण शेगावच्या कचोरी ची बातच न्यारी आहे नक्की करून बघा. कचोरी कचोरी शेगाव ची कचोरी. जय गजानन महाराज. Jyoti Gawankar -
कांदा पालक कॉर्न कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरीकचोरी ही प्रत्येक प्रांतातील फेमस आहे राजस्थान, इंदूर,कानपूर,दिल्ली आणि अजूनही काही प्रांत आहेत त्यात मी राजस्थानी कांदा कचोरीला जरा ट्विस्ट देवून बनवली आहे. पालक ,काॅर्ण घालून हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केला आहे बघा कसा वाटतोय माझा प्रयत्न. Jyoti Chandratre -
मूग डाळ कचोरी (MOONG DAL KACHORI RECIPE IN MARATHI)
#डाळ#रेसिपीबुक#week12#बाकरवडी#कचोरी Yadnya Desai -
खुसखुशीत कचोरी (kachori recipe in marathi)
#EB2 #W2 ... इ बुक, दुसऱ्या आठवड्याच्या चॅलेंज साठी आज मी केलेली आहे कचोरी ...बेसनाच्या सारणाचा वापर करून छान खुसखुशीत. आज रविवारच्या सकाळचा नाश्ता... Varsha Ingole Bele -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#EB2#w2#कचोरीकचोरी म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे येते ती शेगावमधील प्रसिद्ध कचोरी. दिवसातील कोणत्याही वेळेला खाता येईल असा हा पदार्थ महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपासून खाल्ला जाणारा हा पदार्थ आज ६८ वर्षांचा झाला आहे. १९५० मध्ये देशाची फाळणी झाल्यानंतर पंजाबमधून शेगावात आलेल्या तिर्थराम शर्मा यांनी कचोरी सेंटर सुरु केले. येथील रेल्वे स्टेशनवर चरितार्थासाठी सुरु केलेला हा व्यवसाय नंतर शेगावची ओळख बनला. त्यांची ही कचोरी इतकी प्रसिद्ध झाली की लोकांची गर्दी वाढू लागली. त्यामुळे त्यांनी आपल्या या लहानग्या दुकानाचे रुपांतर मोठ्या दुकानात झाले. गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येणारा प्रत्येक जण याठिकाणी आवर्जून कचोरी खातो. इतकेच नाही तर ही कचोरी आपल्या गावी पार्सल म्हणूनही नेली जातेआता ही कचोरी इतकी प्रसिद्ध झाली आहे की पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणीही आता ही शेगाव कचोरी मिळते. सध्या शर्मा यांची चौथी पिढी हा व्यवसाय करत असून करण शर्मा आणि लोहीत शर्मा हे आता हा व्यवसाय पाहतात. आता ही कचोरी परदेशातही मिळत असून त्यासाठी विशेष असे तंत्रज्ञान वापरुन ती फ्रोजन केली जाते.माझ्या फॅमिली सर्वात आवडीची शेगाव कचोरीया कचोरीची स्वतःची की छान टेस्ट आहे तिच्याबरोबर काहीच घेतले नाही अशीच खायला ही कचोरी छान लागते. मी थोडा रेसिपीत स्वतःचे काही बदल करून तयार केली आहे नक्कीच करून बघा शेगाव कचोरी Chetana Bhojak -
More Recipes
टिप्पण्या