कांदाभजी (खेकडा भजी) (kanda bhaji recipe in marathi)

#रेसिपीबुक #week5
पावसाळा सुरु झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा केला जाणारा पदार्थ म्हणजे कांदाभजी. घरोघरी अगदी पूर्वापार चालत आलेली प्रथाच असावी आणि ती जणूकाही केलीच पाहिजे असाच भाव असतो या कांदाभजीच्या करण्यामागे. आणि ती केल्याशिवाय पावसाची गंमत पण वाटत नाही. बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि घरात बनत असलेली खमंग खुसखुशीत कांदाभजी आणि त्याचा घरभर दरवळणारा सुगंध म्हणजे पर्वणीच असते. कांदाभजीचा ओबडधोबड कुरकुरीतपणा हा काही जणांना खेकड्याची आठवण करुन देतो म्हणून याला खेकडा भजी पण म्हणतात. कधी एखाद्या हातगाडीवर खा किंवा एखाद्या गडाच्या सफरीवर खा, पण कांदाभजी कुठेही खायची मजा काही औरच असते.

कुकिंग सूचना
- 1
कांदे धुवून उभे पातळ काप करुन घेतले. त्यात मीठ, तिखट पूड, हळद, धणे-जिरे पूड आणि ओवा घालून मिक्स करुन ते हाताने कुस्करून घेतले, यामुळे कांद्याला छान पाणी सुटते आणि त्यात वेगळे पाणी घालावे लागत नाही. मग त्यात थोडे तेल घालून मिक्स केले.
- 2
मिक्स केलेल्या कांद्याच्या मिश्रणात बेसन पीठ आणि तांदूळ पीठ घातले, आणि सगळे मिक्स केले. याला मीठामुळे आधीच पाणी सुटलेले असल्यामुळे दुसरे पाणी घालायची गरज नाही. तांदळाच्या पीठामुळे भजी कुरकुरीत होतात तसेच यात ओवा घातल्यामुळे भजी खाऊन पोटात त्रास होत नाही.
- 3
मिक्स केलेल्या कांद्याच्या मिश्रणाची तेलात तळून खमंग, खुसखुशीत भजी तयार केली.
- 4
ही गरमागरम कांदाभजी नुसती खायला पण खूप छान लागतात किंवा साॅस अथवा चटणी बरोबर खायला पण खूप मस्त लागतात. एका प्लेटमधे खमंग, खुसखुशीत, गरमागरम कांदाभजी घालून सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या