खान्देश स्पेशल कांदा कुरडई ची भाजी (kuradi bhaji recipe in marathi)

#रेसिपीबुक
#रेसिपी नं 26
आजची साधी सोपी आणि झटपट होणारी
खांन्देश स्पेशल कांदा कुरडई
लॉकडाऊन स्पेशल सुद्धा म्हणु शकता कारण आता बर्याच ठिकाणी परत लाॅकडाऊनला सुरूवात झाली आहे... 😯
घरात भाजी संपलेली आहे किंवा भाजी बनवण्याचा कंटाळा आला 😰आहे तर मग हा एक उत्तम पर्याय 😍😍
खान्देश मध्ये तर वाळवण बनवतो तेव्हा कुरडई बनवली की वाचल्यानंतर जे तार पडतात तेव्हा आणि आॅक्टोबर मध्ये जेव्हा वाळवणाला ऊन दाखवतो तेव्हा हमखास होणारी हि भाजी😊😊 मोठ्या फॅमिली असेल तर नेहमीच होणारी 😋😋चवीला अतिशय भन्नाट आणि माझ्या बर्याच मित्रमैत्रिणींच्या आवडीची आणि माझी सुध्दा बरं... 😘आवडीची कांदा बारीक कुरडई 😋तुम्हाला कोणाकोणाला आवडते मला नक्की कळवा 😍😍चला तर मग सविस्तर रेसिपी पाहु

कुकिंग सूचना
- 1
कुरडई आधी पाण्यात भिजवून घ्या साधारण 10 मिनिटे भिजत ठेवा
- 2
कुरडई छान मऊ झाली की पाणी काढून घ्या व कुरडई चाळणीत किंवा ताटात काढुन ठेवा.
- 3
आता कढईत तेल गरम करून त्यात जीरे, हिंग मस्त फुल्ल की त्यात कांदा टोमॅटो घालुन मस्त मऊ होईपर्यंत छान शिजवुन घ्या.
- 4
आता त्यात वरील सर्व मसाले घालून छान फ्राय करून घ्या. मसाला फ्राय झाला की भिजवलेल्या कुरडई चा चुरा (भुगा) घाला आणि छान परतून घ्या.
- 5
मीठ बेताने घाला (कारण कुरडईत मीठ असतं)
1 ते 2 मिनिटे वाफ काढुन घ्या व कोथिंबीर भुरभुरून तयार आहे गरमागरम कांदा कुरडई ची भाजी तुम्ही भाकरी चपाती सोबत खाऊ शकता,तोंडी लावायला, वरण भाता बरोबर छान पर्याय आहे. 😍😍
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)