खान्देश स्पेशल कांदा कुरडई ची भाजी (kuradi bhaji recipe in marathi)

Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890

#रेसिपीबुक
#रेसिपी नं 26

आजची साधी सोपी आणि झटपट होणारी
खांन्देश स्पेशल कांदा कुरडई

लॉकडाऊन स्पेशल सुद्धा म्हणु शकता कारण आता बर्‍याच ठिकाणी परत लाॅकडाऊनला सुरूवात झाली आहे... 😯

घरात भाजी संपलेली आहे किंवा भाजी बनवण्याचा कंटाळा आला 😰आहे तर मग हा एक उत्तम पर्याय 😍😍
खान्देश मध्ये तर वाळवण बनवतो तेव्हा कुरडई बनवली की वाचल्यानंतर जे तार पडतात तेव्हा आणि आॅक्टोबर मध्ये जेव्हा वाळवणाला ऊन दाखवतो तेव्हा हमखास होणारी हि भाजी😊😊 मोठ्या फॅमिली असेल तर नेहमीच होणारी 😋😋चवीला अतिशय भन्नाट आणि माझ्या बर्‍याच मित्रमैत्रिणींच्या आवडीची आणि माझी सुध्दा बरं... 😘आवडीची कांदा बारीक कुरडई 😋तुम्हाला कोणाकोणाला आवडते मला नक्की कळवा 😍😍चला तर मग सविस्तर रेसिपी पाहु

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
3 सर्व्हिंग
  1. 5 ते 6 कुरडई/भुगा /चुरा
  2. 2कांदे बारीक चिरून
  3. 1टोमॅटो बारीक चिरून
  4. 6ते 7 लसुण पाकळ्या
  5. 1/2 वाटीकोथिंबीर
  6. 2 टेबलस्पुनलाल तिखट
  7. 1 टेबलस्पुनगरम मसाला
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1/2 टीस्पूनहिंग
  10. 1 टेबलस्पुनजीरे
  11. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    कुरडई आधी पाण्यात भिजवून घ्या साधारण 10 मिनिटे भिजत ठेवा

  2. 2

    कुरडई छान मऊ झाली की पाणी काढून घ्या व कुरडई चाळणीत किंवा ताटात काढुन ठेवा.

  3. 3

    आता कढईत तेल गरम करून त्यात जीरे, हिंग मस्त फुल्ल की त्यात कांदा टोमॅटो घालुन मस्त मऊ होईपर्यंत छान शिजवुन घ्या.

  4. 4

    आता त्यात वरील सर्व मसाले घालून छान फ्राय करून घ्या. मसाला फ्राय झाला की भिजवलेल्या कुरडई चा चुरा (भुगा) घाला आणि छान परतून घ्या.

  5. 5

    मीठ बेताने घाला (कारण कुरडईत मीठ असतं)
    1 ते 2 मिनिटे वाफ काढुन घ्या व कोथिंबीर भुरभुरून तयार आहे गरमागरम कांदा कुरडई ची भाजी तुम्ही भाकरी चपाती सोबत खाऊ शकता,तोंडी लावायला, वरण भाता बरोबर छान पर्याय आहे. 😍😍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890
रोजी

Similar Recipes