अळूचं फदफद (alooch fadfad recipe in marathi)

#रेसिपीबुक #week5
पावसाळ्यात अळूच्या पानांचा नुसता बहर असतो.आणि अळू ची पान पौष्टिक असतात. आज मी अळूचे फदफद सांगणार आहेत.
अळूचं फदफद (alooch fadfad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5
पावसाळ्यात अळूच्या पानांचा नुसता बहर असतो.आणि अळू ची पान पौष्टिक असतात. आज मी अळूचे फदफद सांगणार आहेत.
कुकिंग सूचना
- 1
शेंगदाणे, खोबऱ्याचे काप आणि हरभऱ्याची डाळ 1/2तास भिजत theva.
- 2
अळूच्या पानान ची देठे कट करून सोलून घ्या. पानांच्या जाड शिरा काडून टाका. सोललेली देठे आणि पानं बारीक कट करून घ्या.
- 3
आता कुकरच्या एका डब्यात अळूची पानं देठं ठेऊन 1 कप पाणी आणि थोडं मीठ घाला. दुसऱ्या डब्यात भिजवलेले शेंगदाणे, खोबरं, डाळ आणि 1 कप पाणी घालून दोनीही कुकर मधे ठेऊन 2 शिट्या द्या.
- 4
बेसन पीठ 3 टीस्पून पाण्यात कालवून ठेवा.
- 5
कोथिंबीर, लसूण, आलं आणि मिरची याची पेस्ट करा.
- 6
कुकर गार झाल्यावर अळूची पानान मधे चिंच गुळाच पाणी आणि कालवलेले बेसनपीठ घालून रवीने घोटून घ्या. शेंगदाणे व डाळीतील पाणी काडून टाका.
- 7
कढई मध्ये तेल तापल्यावर मोहरी, जिरं, कढीपत्ता घाला. मिरचीचे वाटण, हिंग आणि लाल तिखट घालून 1/2मिनिटं फिरवा.आणि मग शेंगदाणे, डाळ, खोबरं घालून 1 मिनिट परतून घ्या.
- 8
आता अळूचे गरगटे त्यात घालून 2मिनिटं फिरवत राहा. मीठ व तीळ घाला. 3 ते 4 मिनिट उकळून गॅस बंद करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes















टिप्पण्या (3)