ओल्या नारळाची बर्फी (olya naralachi barfi recipe in marathi)

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
Nagpur

#रेसिपीबुक
#week8

नारळी पौर्णिमा निमित्ताने मी ही नारळाची वडी बनवली आणि खूप छान झाली,
माझा भाउ 5 वर्षा पूर्वी राखी जवळच आम्हाला सोडून गेला म्हणून मी राखी करत नाही मनाला प्रचंड वेदना होतात ह्या दिवशी पण मी कुणाला च तसे दर्शवून देत नाही

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीखोवलेले ओले नारळ
  2. 1 वाटीसाखर
  3. 1/2 वाटीदूध कीव साय
  4. 1 टेबलस्पूनतूप
  5. 1 टीस्पूनवेलची पावडर

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम नारळ खोवून घ्यावे किंवा बारीक काप करून मिक्सरमधून काढून घ्यावे

  2. 2

    आता एका नॉनस्टीक पॅनमध्ये तूप टाका तूप गरम झाले की खोबरे टाका व दोन मिनिट होऊ द्या व त्यावर साखर टाका

  3. 3

    साखर थोडी मिक्स झाली की त्यात दूध टाका व हलवत रहा साखर विरघळली म्हणजे थोडे मिश्रण पातळ होईल पण मिडीयम गॅस वर मिश्रण हलवत रहा

  4. 4

    मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत रहावे गोळ्यासारखा तयार झालं कि गॅस बंद करा वरून वेलची पावडर टाका

  5. 5

    एका ताटाला तूप लावून घ्या व त्यावर हे मिश्रण पसरवा गरम असताना च वड्या कापून घ्या व थंड होवू द्या

  6. 6

    आता आपल्या ओल्या नारळाच्या वड्या तयार आहेत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes