तिरंगा भोजन

जैन स्पेशल गट्टे का शाक (भाजी). गट्टे का shaak आम्ही पर्युषण मध्ये हमकास बनवतो. बेसन वापरून गट्टे बनवले जातात आणि gravy मध्ये दही वापरला जात. जेणेकरून ग्रेव्ही ला आंबट तिखट टेस्ट येईल
भात - रोज उपयोगात येणारा
सालासकट मुगाच्या डाळीचा ढोकळा - सासूचा उपवास असल्यामुळे, ती एकच तिने जेवते, गॅस होई नये म्हणून हेल्दी मूंग डाळ ढोकळा ती पसंत करते.
तिरंगा भोजन
जैन स्पेशल गट्टे का शाक (भाजी). गट्टे का shaak आम्ही पर्युषण मध्ये हमकास बनवतो. बेसन वापरून गट्टे बनवले जातात आणि gravy मध्ये दही वापरला जात. जेणेकरून ग्रेव्ही ला आंबट तिखट टेस्ट येईल
भात - रोज उपयोगात येणारा
सालासकट मुगाच्या डाळीचा ढोकळा - सासूचा उपवास असल्यामुळे, ती एकच तिने जेवते, गॅस होई नये म्हणून हेल्दी मूंग डाळ ढोकळा ती पसंत करते.
कुकिंग सूचना
- 1
गट्टासाठी, सर्व साहित्य मिसळा आणि पाणी वापरून मऊ पिठ मळून घ्या. तयार पीठ समान बॉलमध्ये विभागून पातळ दांडाकृती (पेन्सिलपेक्षा थोडे जाड) रोल करा.
- 2
मोठ्या पॅनमध्ये 3 कप पाणी उकळवा. जेव्हा हे उकळी येते तेव्हा हे रोल ठेवा आणि त्यांना 10-15 मिनिटे शिजू द्या.
पाण्यातून रोल काढा आणि प्लेटमध्ये स्थानांतरित करा. बाकीचे पाणी ग्रेव्ही बनवण्यासाठी ठेवा. त्यांना 5-7 मिनीटे थंड होऊ द्या. एकावेळी एक रोल घ्या आणि समान भागामध्ये कट करा आणि बाजूला ठेवा (सुमारे 40 गट्टा असावे). - 3
ग्रेव्हीसाठी कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला. ते फोडले की त्यात १/२ कप पाणी आणि कोरडे मसाले घाला. पाणी उकळण्यास सुरवात झाली की, सर्व गट्टा ग्रेव्हीमध्ये घालून साधारण 4--5 मिनिटे व्यवस्थित शिजू द्यावे. सर्व गट्टा शिजल्यावर (एक खाऊ शकतो आणि गट्टा व्यवस्थित शिजला आहे की नाही ते तपासू शकतो), नंतर ग्रेव्ही मध्ये दही घाला आणि मिक्स करावे.
- 4
भात बनविण्यासाठी
एका पातेल्यात 3-4 कप पाणी गरम करा. त्यात धुतलेले तांदूळ घाला. आपल्या आवडीनुसार भात शिजवून घ्या. - 5
ढोकल्याचे पिठ बनविणे
मूग डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
धुतलेली मुगाची डाळ 2 ते 3 तास भिजत ठेवा. मग पाणी काढून टाका.
भिजलेली मूग डाळ जिरे, मिरपूड, मीठ आणि १/२ कप पाणी घालून भरड पेस्ट करून घ्या.
पेस्ट फार बारीक करू नका.
तसेच पीठ जास्त जाड किंवा पातळ नसावे परंतु ढोकळाच्या पिठासारखे असावे. - 6
ढोकला बनवण्याची क्रिया
एका मोठ्या भांड्यात सुमारे 2 ते 3 कप पाणी गरम करून उकळी येऊ द्या.
थोड तेल गोल प्लेटल लावा.
ढोकळा मिश्रणात दही आणि एनो घाला आणि चांगले मिक्स करावे.
हे ताबडतोब ग्रीस प्लेटमध्ये घाला.
प्लेट मोठ्या पॅनमध्ये ठेवा जिथे आधीच पाणी उकळण्यास प्रारंभ झाला असावा.
भांड्यावर झाकण ठेवून 12 ते 15 मिनिटे किंवा ढोकळा होईपर्यंत वाफ काढावी. ढोकळाला थंड होऊ द्या आणि नंतर आपण ते प्लेटमधून काढू शकता.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- मल्टि ग्रेन तिरंगा पराठा बाईट्स (paratha bites recipe in marathi)
- झटपट आळू वडी (aloo vadi recipe in marathi)
- तिरंगी रसकदम (tiranga ladoo recipe in marathi)
- बिंदालू पनीर टाकोज् (bindalu paneer tacos recipe in marathi)
- फ्रेंच फ्राईज कॉईल्ड कटोरी चाट (french fried coiled katori chaat recipe in marathi)


















टिप्पण्या (2)