फ्रेंच फ्राईज कॉईल्ड कटोरी चाट (french fried coiled katori chaat recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

फ्रेंच फ्राईज कॉईल्ड कटोरी चाट (french fried coiled katori chaat recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. पारी करिता साहित्य
  2. 200 ग्रॅममैदा
  3. 1/2 चमचाओवा
  4. चिमुटभरमीठ
  5. मोहन करिता: -
  6. 1/2 वाटीतेल
  7. फ्राईज करिता: -
  8. 2पोटॅटो
  9. बारीक शेव
  10. 1 कांदाबारीक चिरलेला
  11. 1 टोमॅटोबारीक चिरलेला
  12. डाळींबाचे दाणे
  13. कोथिंबीर
  14. टोमॅटो केचप

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका परातीत 200 ग्रॅम मैदा घेऊन त्यात ओवा, मीठ आणि मैद्याचा गोळा होईल इतपत तेल घालून छान मिक्स करून घ्या.

  2. 2

    आता त्यात थोडे पाणी घालून त्याचा गोळा तयार करून घ्या. तयार गोळा झाकून वीस मिनिटे तसंच ठेवून द्या.

  3. 3

    वीस मिनिटानंतर तयार गोळ्याची एक पोळी लाटून,आधी साईडच्या कडा कापून नंतर उर्वरित पोळीच्या पट्ट्या कापून घ्या. आता एका वाटीला मागच्या साईडने तेल लावा. (फोटोत दाखविल्याप्रमाणे) त्या पट्ट्या वाटीवर ठेवून द्या.

  4. 4

    आता परत दुसरी एक पट्टी घेऊन (फोटोत दाखविल्याप्रमाणे) चटई विनतो त्याप्रमाणे, त्या पट्ट्या ठेवून संपूर्ण वाटी बंद करून घ्या. व ती वाटी मध्यम गरम तेलात सोडून तळून घ्या. अशा प्रकारे सर्व टोपल्या तयार करा.

  5. 5

    आता दोन पोटॅटो घेऊन त्याची साल काढून घ्या व त्याच्या लांब आकाराच्या बारीक फ्राईज तयार करून घ्या. तयार फ्राईज गरम गरम तेलातून खरपूस तळून घ्या. तळलेल्या फ्राईज वर तिखट मीठ घाला व छान मिक्स करून घ्या.

  6. 6

    आता तयार मैद्याची टोपली घेऊन, त्यात सर्वप्रथम पोट्याटो फ्राईज कांदा, टोमॅटो परत पोटॅटो फ्राईज, टोमॅटो केचप, वरती शेव, डाळिंबाचे दाणे,कोथिंबीर आणि परत टोमॅटो केचप घालून सर्व्ह करा.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Seema Mate
Seema Mate @cook_22805348
रोजी

Similar Recipes