पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)

#रेसिपीबुक #week11
post1
संपूर्ण महाराष्ट्रात गौरी-गणपती साठी पुरणपोळीचा नैवेद्य महत्वाचा असतो. पुरणपोळीच्या थाळीत वरण-भात,कटाची आमटी किंवा सार, कुरडई भजे पापड हे पदार्थांची पण रेलचेल असते. तसेच महाराष्ट्रीयन कुटुंबात ज्या गृहिणीला पुरण पोळी येते तिला सगळा स्वयंपाक येतो असे गृहीत धरले जाते.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम चणाडाळ पाच मिनिट भिजवावी व नंतर शिजवून घ्यावी
- 2
आता शिजवलेली चणाडाळ निथळून घ्यावी व त्यात साखर घालून शिजत ठेवावी
- 3
जोपर्यंत पुरण शिजत आहे तोपर्यंत गव्हाचे पिठात तेल व मीठ घालून सैलसर पीठ मळून घ्यावे. पाच मिनिट तिम्बट ठेवावे.
- 4
पुरण घट्ट शिजवून घ्यावे व नंतर पुरण यंत्रातून गाळून घ्यावे व त्यात वेलदोड्याची पूड मिक्स करावी.
- 5
आता तयार कणकेची पुरी लाटावी व त्यात सारण भरून मोदका प्रमाणे आकार द्यावा
- 6
आता त्या मोदकाला मधोमध दाबून त्याची पुरण पोळी लाटावी
- 7
पुरणपोळी तव्यावर खरपूस भाजून घ्यावी. त्याला तूप लावून गरमागरम पोळी दुधाबरोबर सर्व करावी
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या