कुकिंग सूचना
- 1
प्रथम भेंडी स्वच्छ धुऊन घ्यावी, आणि एक इंच एवढे कापून घ्यावी
- 2
त्यानंतर फुल गॅस वर 2-3 मिनिटे भेंडी भाजून घ्यावी. (डाग येईपर्यंत)
- 3
मध्यम आकाराचे २-३ कांदे बारीक चिरून घ्यावेत तसेच टोमॅटो बारीक करून घ्यावा..(टोमॅटो प्युरी केल्यास उत्तम)....
- 4
नंतर कढईत तेल गरम करुन त्यात जिरे व बारीक केलेला लसूण घालून फोडणी करावी.
- 5
त्यानंतर त्यात कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यावा....नंतर टोमॅटो व आले लसूण पेस्ट घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यावे
- 6
एका वाटीत दोन ते चार चमचे ताजे दही घेऊन त्यात हळद, धने जिरे पावडर, गरम मसाला, मालवणी मसाला व चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घ्यावे...
- 7
हे तयार झालेले मिश्रण केलेल्या फोडणीमध्ये घालावे, तेल सुटे पर्यंत शिजवून घ्यावे....व नंतर भाजलेली भेंडी त्यात घालून गरजेनुसार पाणी घालून व चवीनुसार मीठ घालून एक वाफ काढावी....
- 8
आपली मसाला भेंडी तयार......
Tips
चपाती किंवा भाकरीबरोबर उत्तम लागते....
Similar Recipes
More Recipes













टिप्पण्या