रवा बेसन बर्फी (rava besan barfi recipe in marathi)
#बर्फी
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम पॅन मध्ये तूप टाका. त्यात बेसन आणि रवा टाकून गुलाबी रंगावर भाजून घ्या.नंतर मिल्क पावडर टाका.
- 2
एका गॅसवर १ १/४ साखर आणि १ कप पाणी घेऊन साखरेचा पाक तयार करायला ठेवा. साखरेचा पाक उकळत आल्यावर त्यात दोन चमचे दूध घाला. म्हणजे पाकची मळी निघून जाईल. ती चमच्या ने काढून घ्या.
- 3
पाक एक तारी झाला की भाजलेल्या बेसानात ओतून घ्या. व एकजीव करा. पाक ओतल्यावर लगेच त्यात सुकामेवा घालून घ्या.व मिश्रण थोडे घट्ट होई पर्यंत मंद गॅस वर परतवून घ्या.
- 4
नंतर मिश्रण ग्रीस केलेल्या ताटात काढून थोडे थंड होऊ द्या. व बर्फी तयार करा
- 5
आणि तयार आहे तुमची रवा बेसन बर्फी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13537195












टिप्पण्या