तेल पोळी/ पुरण पोळी (puranpoli recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#रेसिपीबुक #week11

पुरणपोळआणिआप्पेरेसिपीPost1

महाराष्ट्राची आन बान आणि शान असलेली पुरणपोळी ही प्रत्येक सणाचे आकर्षण! होळीला,चैत्री पाडवा , संक्रांत,व गौरी साठी पण मऊसूत  पुरणाने  गच्च भरलेली , सोनसळी रंगाची , नाजूक किंचित जाडसर लाटलेली पोळी जेव्हा तव्यावर साजूक तुपात खमंग भाजली जाते ना तेव्हा त्या खरपूस सुवासाने घरातील  कोपरा ना कोपरा मंगलमय होऊन जातो! पुरणपोळी म्हणजेच आनंदोत्सव हे जणू महाराष्ट्रात समीकरण ठरलेलेच आहे.बरं  ही पुरणपोळी महाराष्ट्रातच नाही तर गुजरात, केरळ आणि कर्नाटकमध्ये सुद्धा बनवली जाते. “होळिगे ” हे पुरणपोळीचे कर्नाटकी नाव.प्रत्येक राज्यांत थोडाफार बदल पाहायला मिळतो जसे आपल्या पुरणात चणा डाळ महत्त्वाची तसे गुजरातला तुरीच्या डाळीचे पुरण  घाटले जाते व तीथे वेढमी ह्या नावाने ओळखली जाते. कोणी नुसत्या मैद्याच्या किंवा कणकेच्या पोळ्या बनवतात.

आमच्या सीकेपी पारंपारिक पद्धती प्रमाणे रवा व मैदा किंवा नुसता बारीक रवा वापरून आणि पोळी लाटताना एक विशिष्ट प्रकारच्या पोळीच्या पत्र्यावर तेला वर लाटून ह्या पुरणपोळ्या तयार करतात म्हणून त्याला तेल पोळी म्हणतात.रवा व मैद्या वापरल्याने एकदम खुसखुशीत तोंडांत ठेवताच विरघळणारी ही तेल पोळी एकदा खाल्लेली की त्याचा स्वाद कायम स्मरणात रहाणार.

आता मला असे वाटतेय एवढे वर्णन वाचल्यावर  तुम्हालाही वाटायला लागलेय ना , की तेल पोळी /पुरणपोळीचा  घाट घातलाच पाहिजे लवकर ! मग चला तर लागू  कामाला व आज बनवूया सीकेपी स्पेशल तेल पोळी आणी ते मस्त घरचे लोणकडे तुप किंवा दूधा बरोबर फस्त करुया 😋😋😋!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२ ता ३०मिंनिटे
12 पुरणपोळ्या
  1. पुरणा साठी
  2. 2 कपचण्याची डाळ
  3. 2 कपगुळ (चिरुन)
  4. 1 टेबलस्पूनवेलचीपूड
  5. 1/2 टेबलस्पूनजायफळाची पूड
  6. चिमूटभर मीठ
  7. आवरणासाठी
  8. 1 कपबारीक रवा
  9. १ कप मैदा
  10. चवीनुसार मीठ
  11. 2 टेबलस्पूनकेशर चे पाणी
  12. 1/2 कपतेल

कुकिंग सूचना

२ ता ३०मिंनिटे
  1. 1

    सर्व प्रथम तेल पोळी च्या आवरणासाठी आपण रवा व मैदा सम प्रमाणात घेऊन त्यात थोडेसे मीठ,तेल व केशर मिश्रीत पाणी घालूया.केशर मुळे पोळीला छान रंग येतो.

  2. 2

    हे सर्व आपण रव्या व मैद्याला व्यवस्थित चोळून घेऊया.

  3. 3

    आता थोडे थोडे पाणी घालून त्याचा गोळा करून मळून घेऊया.हा रवा-मैदा आपण दीड तास भिजवून ठेऊया

  4. 4

    दीड तासात नंतर फुडप्रोसेसर ला हे लावल्या मैद्याचे मिश्रण थोडेसे तेल व पाणी घालून.एगदी नरम करून घेऊया.

  5. 5

    फुडप्रोसेसर मधून बाहेर काढून तेलाने तिंबून घेऊया.

  6. 6

    पुरण तयार करण्यासाठी एका भांड्यात चण्याची डाळ २तास भिजवून नंतर कुकरला ३-४ शिट्या घ्या म्हणजे डाळ पटकन शिजते.

  7. 7

    आता शिजवून घेतलेल्या डाळीतील पाणी काढून.त्यात गुळ घालावा.

  8. 8

    जसे जसे त्यातील गुळ विरघळले तसे पुरण पातळ होईल व पुन्हा हळूहळू पुर्ण घट्ट होईल

  9. 9

    पुरणाच्या पातेल्यात कलथा सरळ उभा राहिला की पुरण झाले समजावे.

  10. 10

    पुरण झाले की त्यात वेलचीपूड व जायफळ पूड घालावी.हे पुरण थोडे गरम असतानाच पुरणाच्या जाळीवर घासून पुरण तयार करून घ्यावे

  11. 11

    तेल पोळी करण्यासाठी ॲल्युमिनियम च्या पत्र्यावर आपल्या ला तेल पोळ्या करायच्या आहेत.

  12. 12

    भिजवलेल्या पिठाचा लिंबा एवढा गोळा घेऊन त्यात त्याच्या दुपटीने पुरणाचा गोळा घ्या.तो व्यवस्थित सगळी कडून कवर करा.

  13. 13

    आजची हातानेच थोडी थोडी सर्व बाजूने थोडी थापून घ्या व नंतर लाटण्याने पोळी लाटून घ्या.ही पोळी तेलात वरच वाटतात म्हणून त्याला तेल पोळी म्हणतात.

  14. 14

    सपाट तव्या वर आता पोळी लाटलेला पत्रा उलट करुन कलथ्याने थोडी पोळी सुट्टी केली की बाकीची पत्र्यावरील पोळी तव्यावर उतरते.

  15. 15

    आता ही पोळी तव्यावर व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजून घ्या.

  16. 16

    ह्या प्रमाणे सर्व पुरणपोळ्या तयार करून घ्या.तेला वर लाटलेली व रव्या मैद्याची ही पोळी तोंडात ठेवता विरघळते एवढी खुसखुशीत तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

Similar Recipes