पूरण पोळी (puranpoli recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#रेसिपीबुक #week11

महाराष्ट्राची आन,बान आणि शान असलेली पुरणपोळी ही प्रत्येक सणाचे आकर्षण! मऊसूत पुरणाने गच्च भरललेली पोळी जेव्हा तव्यावर साजूक तुपात खमंग भाजली जाते ना तेव्हा त्या खरपूस सुवासाने घरातील कोपरा ना कोपरा मंगलमय होऊन जातो. पुरणपोळी म्हणजेच आनंदोत्सव हे जणू महाराष्ट्रात समीकरण ठरलेलेच. ही पुरणपोळी महाराष्ट्रातच नाही तर गुजरात, केरळ आणि कर्नाटकमध्ये सुद्धा बनवली जाते. कोणी नुसत्या मैद्याच्या किंवा कणकेच्या पोळ्या बनवते तर आमच्या कोकणात मैदा आणि कणिक दोन्ही मिसळून पोळ्या बनवतात. सात दिवसांच्या गणपती मध्ये नैवेद्यासाठी आम्ही नैवेद्यासाठी पूरणपोळ्या बनवतो.

पूरण पोळी (puranpoli recipe in marathi)

#रेसिपीबुक #week11

महाराष्ट्राची आन,बान आणि शान असलेली पुरणपोळी ही प्रत्येक सणाचे आकर्षण! मऊसूत पुरणाने गच्च भरललेली पोळी जेव्हा तव्यावर साजूक तुपात खमंग भाजली जाते ना तेव्हा त्या खरपूस सुवासाने घरातील कोपरा ना कोपरा मंगलमय होऊन जातो. पुरणपोळी म्हणजेच आनंदोत्सव हे जणू महाराष्ट्रात समीकरण ठरलेलेच. ही पुरणपोळी महाराष्ट्रातच नाही तर गुजरात, केरळ आणि कर्नाटकमध्ये सुद्धा बनवली जाते. कोणी नुसत्या मैद्याच्या किंवा कणकेच्या पोळ्या बनवते तर आमच्या कोकणात मैदा आणि कणिक दोन्ही मिसळून पोळ्या बनवतात. सात दिवसांच्या गणपती मध्ये नैवेद्यासाठी आम्ही नैवेद्यासाठी पूरणपोळ्या बनवतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५० मिनिटे
४ माणसे
  1. पूरणासाठी::
  2. 1 आणि 1/2 कप चण्याची डाळ
  3. 3 कपपाणी
  4. 1 टिस्पून हळद
  5. 1 टिस्पून मीठ
  6. 1 टिस्पून सूंठ पावडर
  7. 1 टिस्पून वेलची जायफळ पूड
  8. 1 आणि 1/4 कप गूळ
  9. 1/2 कपसाखर
  10. आवरणासाठी::
  11. 1 कपमैदा
  12. 1 कपगव्हाचे पीठ
  13. चिमूटभर मीठ
  14. 1 टेबलस्पूनतेल
  15. गरजेनुसार पाणी
  16. 1/4 कपतेल
  17. कटाची आमटी::
  18. 2-3 कपकट
  19. 1 टिस्पून लाल तिखट
  20. 1/2 टिस्पून हळद
  21. 1 टेबलस्पूनगोडा मसाला
  22. 1/4 कपभाजून वाटलेलं सूकं खोबरं
  23. 1 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  24. 1 टेबलस्पूनगूळ
  25. फोडणीसाठी::
  26. 1 टेबलस्पूनतेल
  27. 1 टिस्पून जीरं
  28. 5-6कडिपत्याची पाने
  29. 1/2 टिस्पून हिंग
  30. 1 टिस्पून मोहरी
  31. 2-3लवंगा
  32. 2-3तमालपत्रे
  33. 7-8मिरीचे दाणे

कुकिंग सूचना

१५० मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम चण्याची डाळ शिजवण्यासाठी एका पातेल्यात ५ कप पाणी उकळत ठेवा।चणा डाळ १ कप घेतल्याने तिच्या ५ पट पाणी घ्या.पाण्याला उकळी आली की त्यात भिजवलेली डाळ आणि हळद घालून मंद ते माध्यम आचेवर झाकण घालून शिजू द्या.पोळ्यांसाठी पीठ भिजववायला घ्या.. मैदा, गव्हाचे पीठ आणि मीठ घालून एकत्र मिसळून घ्या. १ टेबलस्पून तेल घालून पिठात चांगले रगडून घ्यावे जेणेकरून पोळ्या खुसखुशीत होतात.

  2. 2

    थोडे थोडे पाणी घालून पोळ्यांची कणिक चांगली तिंबून घ्या. फार जास्त मऊ किंवा घट्ट असे पीठ मळू नये. पीठ जरासं मुलायम झाले कि त्याला २ टीस्पून तेलाचा हात लावून चांगले रगडून घ्या. मग त्याचे छोटे छोटे गोळे करून तेलामध्ये १ तासभर तिंबवून ठेवा.

  3. 3

    चण्याची डाळ मंद आचेवर अर्ध्या तासात शिजते. डाळीचा दाणा हाताने दाबून बघा. लगेच पिठुळ झाला तर समजावे कि डाळ शिजली. डाळ चाळणीत काढून तिचे उरलेले पाणी म्हणजेच "कट" वेगळा बाजूला काढा. पुरण शिजवण्यासाठी एका कढईत १ टेबलस्पून तूप घालून त्यात शिजलेली चण्याची डाळ (गरम असतानाच) घालावी आणि बरोबरच किसलेला गूळ आणि साखर घाला. मंद ते माध्यम आचेवर गूळ पूर्ण विरघळू द्या.

  4. 4

    मंद ते माध्यम आचेवर गूळ पूर्ण विरघळू द्या. पुरण शिजेपर्यंत वेलच्या आणि जायफळ खलबत्त्यात कुटून किंवा मिक्सरमधून फिरवून बारीक पावडर करून घ्या. १५ मिनिटांत पुरण शिजत आले की त्यातील गुळाचा आणि साखरेचा रस आटत येऊन डाळीत एकजीव होतो. पुरण शिजले कि नाही हे पाहण्यासाठी त्याच्या मधोमध कढईत एक चमचा उभा करून ठेवा. जर तो चमचा नीट उभा राहिला तर समजावे कि पुरण शिजले! या उप्पर पुरण शिजवू नये नाहीतर पुरण कोरडे पडून ते पिठात भरता येणार नाही.

  5. 5

    गॅसवरून उतरवून पुरण थंड होऊ द्यावे.
    पुरण थंड झाले कि ते पुरणयंत्रातून किंवा मिक्सरमधून फिरवून बारीक वाटून घ्यावे. बारीक केल्यानंतर त्यात वेलची जायफळ पूड आणि सूंठ पावडर घालून मिक्स करून घ्या.

  6. 6

    मुरलेल्या पीठाच्या गोळ्याची मोदकासारखी पारी करून त्यात पिठाच्या गोळ्याच्या आकारापेक्षा थोडा जास्त पुरणाचा गोळा घेऊन दाबून भरत जा. नीट बंद करून हाताने चपटा करून पोळी लाटण्यास सुरुवात करावी.

  7. 7

    नीट बंद करून हाताने चपटा करून पोळी लाटण्यास सुरुवात करावी. तवा मध्यम आचेवर गरम करून पोळी दोन्ही बाजूंनी भरपूर तूप घालून खरपूस गुलाबी करड्या रंगावर भाजून घ्यावी. या पोळ्या खुसखुशीत तर बनतातच परंतु ५-६ दिवस बाहेर ठेवून सुद्धा खराब होत नाहीत.

  8. 8

    या पोळ्या खुसखुशीत तर बनतातच परंतु ५-६ दिवस बाहेर ठेवून सुद्धा खराब होत नाहीत.

  9. 9

    आता कटाची आमटी करायला घेऊया. पूरणपोळीसाठी कटाची आमटी हवीच ना. वर दिल्याप्रमाणे सर्व साहित्य प्लेटमध्ये काढून घ्या. एका भांड्यात तेल गरम करा. गरम तेलात सर्व खडे मसाले, कडिपत्त्ता, मोहरी, हिंग, जीरं टाकून परतून घ्या.

  10. 10

    आता गॅस बंद करून सर्व मसाले टाका जेणेकरून आपली फोडणी करपणार नाही. तेलामध्ये लाल, हळद, गोडा मसाला टाकून परतून घ्या. आता बाजूला काढून ठेवलेला कट घालून ढवळून घ्या. आता गॅस चालू करा. एक मिनिट झाकण ठेवून आमटी उकळू द्या. एक मिनीटाने त्यात वाटलेले सुकं खोबरं, गूळ,चिंचेचा कोळ टाकून परत एक-दोन मिनिटे आमटी शिजू द्या. गरम गरम पोळी कटाच्या आमटी बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
स्मिता जाधव
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes