पनीर कचोरी (paneer kachori recipe in marathi)
कचोरी
कुकिंग सूचना
- 1
मैद्या मध्ये मीठ घालून थंड तेलाचं मोहन घालून मैदा भिजवून घ्या।आणि याला साईडला करून द्या.
- 2
चोपर मध्ये मिरची, लसूण, आलं व कडीपत्ता एकदम बारीक चॉप करून घ्या।1/2 टेबल स्पून तेल गरम करून त्यात मोहरी तडतडल्या नंतर बारीक चॉप केलेलं साहित्य त्यात घाला।त्यानंतर त्यात बडीशोप घाला.हे चांगलं भाजून झालं की त्यात तिखट, हळद आणि धणे पावडर घाला.
- 3
- 4
आता त्याच चाॅपर मध्ये पनीर पण बारीक चाॅप करून घ्या किंवा किसलेले पनीर सुद्धा युज करू शकता.
- 5
आणि आता हे बारीक पनीर फोडणीत ॲड करा, पनीर घातल्यावर कदाचित पनीरचं थोडं पाणी सुटेल पण ते पाणी पूर्ण सुके पर्यंत गॅसवर हे भाजत राहायचं आहे।पनीरचे पाणी सुकलं की गॅस बंद करा । व वरून कोथिंबीर घालुन त्याला चांगला मिक्स करून घ्या.
- 6
आता भिजवून ठेवलेला मैद्याचा ऊंडा परत एकदा मळा व त्याचे गोळे करून घ्या।एक गोळा हातात घेऊन त्या मध्ये मध्य भागी चित्रात दाखवल्याप्रमाणे पनीरचे सारण भरा व त्याला वरून मोदकासारखे पॅक करून हाताने दाबून घ्या.
- 7
हळुवार पणे लाटण्याने हलकं लाटा.
- 8
तेल गरम करून अगदी मंद आचेवर याला दोन्ही बाजूने खरपूस तळुन काढा।आणि पनीर कचोरी रेडी आहे याला मी नारळ आणि दह्याच्या चटणी व तळलेल्या मिरची बरोबर सर्व केला आहे।
Keywords
Similar Recipes
More Recipes






















टिप्पण्या