फराळी मिसळ /उपवासाची मिसळ (upwasachi misal recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

फराळी मिसळ /उपवासाची मिसळ (upwasachi misal recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-60 मिनीटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमबटाटे
  2. 150-200 ग्रॅम शेंगदाणे
  3. 4 टेबलस्पूनओले खोबरे
  4. 2 टेबलस्पून शेंगदाणे कुट
  5. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  6. 200 ग्रॅम बटाटे चिवडा
  7. 2 टीस्पून साखर
  8. 1 टीस्पून मीठ
  9. 2 टीस्पूनजीरे
  10. 1 टीस्पूनजिरेपूड
  11. 1 इंच. आले मोठे तुकडे कापून
  12. 3-4 काड्या कढीपत्ता
  13. 1 लिंबू
  14. 3/4 हिरव्या मिरच्या
  15. 2 टेबलस्पून कोथिंबीर उपवासाला खात असाल तर चिरलेली
  16. 200 एम्.एलपाणी

कुकिंग सूचना

40-60 मिनीटे
  1. 1

    शेंगदाणे रात्री भिजत घालणे,शेंगदाणे व बटाटे दोन्ही कुकरमधे उकडून घेणे साधारण 3/4 शिट्या घ्याव्यात.. कुकर होत असताना खवलेला नारळ मिक्सर मधून फिरवून घ्यावा.व बटाटे चिरून घेणे व खालील प्रमाणे तयारी करावी म्हणजे जिन्नस विसरले जाणार नाहीत.हवे असल्यास तुम्ही ह्यात काजु तुकडे घालू शकता

  2. 2

    नंतर कढई गॅस वर गरम करत ठेवणे त्यामधे 2 टेबलस्पून तूप टाकणे व गरम झाले कि जिरे घालणे त्यानंतर मिरच्या,आल्याचे तुकडे,कढीपत्ता फोडणीला घालून नंतर त्यात बटाटे,शेंगदाणे,खोबरे वाटण,शेंगदाणे कुट घालावा व पाणी घालुन 10 मिनिटे उकळून घ्यावे नि गॅस बंद करावा.

  3. 3

    उपवासाची मिसळ खाण्यासाठी तयार.एका बाऊल मधे वरील मिसळ घेणे त्यामधे वरून बटाट्याचा चिवडा घालणे,कोथिंबीर पेरणे व लिंबू पिळून खायला देणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes