प्रसादम पुलीहोरा (prasadam pulihora recipe in marathi)

#GA4
#week1
#tamarind
गोल्डन अप्रोन पझल चॅलेंज मधली तामारिंड या कोड मध्ये मी दक्षिण भारत कडील मंदिरात बनवली जाणारी प्रसाद पुलिहोरा ही रेसिपी बनवली आहे. तशी ही डिश मी पहिल्यांदाच बनवली आहे, पण खरं सांगू हे राइस खाल्यावर मला मी चक्क साऊथ मध्ये बसून जेवल्यासारख वाटायला लागलं, एकदम त्यांच्याच हातासारखी चव, एवढा छान झाला होता हा राइस की मला पुन्हा बनवून खायची इच्छा व्हायला लागली.(Tamarind Rice)

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून 30 मिनिट पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर एका पातेल्यात पाण्यामध्ये तेल आणि मीठ घालुन तांदूळ शिजवून घ्या. थंड झाला की हाताने मोकळा करून घ्या.
- 2
मसाल्यासाठी एका पॅन मध्ये चना डाळ, उडीद डाळ, धानिया, मेथीचे दाणे, तीळ 2 मिनिट भाजून घ्या, शेवटी त्यामध्ये लाल मिरची आणि हिंग घाला, थंड झाले की मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.
- 3
30 मिनिट पाण्यामध्ये चिंच भिजत ठेवा, त्यांनतर हाताने कुस्करून चिंचेचं पाणी गाळणीने गाळून घ्या.
- 4
एका कढईमध्ये 3-4 टेबलस्पून तेल घाला त्यात आधी शेंगदाणे घाला, शेंगदाणा थोडा लालसर झाला की त्यात चना डाळ, उडीद डाळ, मोहरी घाला व डाळीचा रंग बदलेस्तोवर तळा, नंतर लाल मिरची, हिरवी मिरची, कडीपत्ता घाला.
- 5
त्यानंतर त्यात चिंचेचं पाणी घाला मग हळद, हिंग, मीठ घालून 5 मिनिट लो फ्लमे वर शिजवून घ्या, त्यानंतर शिजलेला भात आणि सुखा मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- 6
गरम गरम सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या